Assembly : मिशन विधानसभा; मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

Assembly : मिशन विधानसभा; मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

0
Assembly : मिशन विधानसभा; मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
Assembly : मिशन विधानसभा; मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

Assembly : नगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जुलै २०२४ या अर्हता तारखेनुसार मतदार याद्या केल्या जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात विधानसभा (Assembly) निवडणुकीसाठी २० ऑगस्टला अंतिम मतदार यादी (Voter Lists) जाहीर होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ पूर्ण होत आहे. त्याअगोदर राज्यात निवडणुका घेऊन सरकार स्थापन होण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. दरम्यान, यावेळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू शकेल. त्यामुळे आचारसंहिता लागू व्हायला, अवघा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे.

नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

असा असणार मतदार याद्यांचा कार्यक्रम (Assembly)

केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) मतदान नोंदणीसाठी घरोघरी सर्वेक्षण : २५ जून ते २४ जुलै २०२४

प्राथमिक मतदार यादी प्रसिद्धी : २५ जुलै २०२४

मतदार यादीवरील हरकती : २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४

हरकतींचे निराकरण करण्यासाठी विशेष मोहीम : शनिवार, रविवार

हरकतींवरील निकाल : १९ ऑगस्ट २०२४

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : २० ऑगस्ट २०२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here