Assembly By-Election | राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; सात उमेदवारांत लढत

0

Assembly By-Election | नगर : राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत (Assembly By-Election) सोमवारी (ता. ६) दुपारी ३ वाजेपर्यंत ३० उमेदवारांनी ४२ अर्ज दाखल केले होते. यातील सात उमेदवारांचे अर्ज मंगळवारी (ता. ७) अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. त्यावेळी २३ जण उमेदवार करत होते. बुधवारी (ता. ८) सात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आज सकाळपर्यंत १६ उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात होते. यातील ९ जणांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतले. अखेर सात उमेदवारांमध्ये लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का? या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हे वाचा – अशोक खरातची ‘स्पेशल २६’ स्टाईल! बनावट आधिकाऱ्यांकडून स्वतःच्या भक्तांवरच छापे; व्यावसायिक व उद्योजकांना घातला गंडा

भाजपचे प्रयत्न असफल (Assembly By-Election)

उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अवघा एक तास उरला असताना, बिनविरोध निवडीसाठी भाजपचे प्रयत्न असफल ठरले. मात्र कमीत कमी उमेदवार असावेत हे प्रयत्न यशस्वी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार गोविंद मोकाटे हे आज सकाळपासूनच अज्ञातस्थळी होते माहिती आहे. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे आठवडे बाजारात प्रचार करताना दिसून आले. वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. हे दुपारी स्पष्ट झाले होते.

अवश्य वाचा – चालू आठवड्यात पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे ५० ते ६० टँकर ठप्प होण्याची शक्यता

नऊ उमेदवारांची माघार (Assembly By-Election)

दरम्यान, आज (गुरुवारी) दुपारपर्यंत आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. रवींद्र मोरे, साहेबराव म्हसे, बाळासाहेब जाधव, नागेश जाधव, नामदेव पवार, अनिल जाधव, सविता शेटे, संभाजी धोंडे यांनी अर्ज मागे घेतले होते. आणखी एक अर्ज शेवटी आज माघारी झाली. त्यामुळे सात उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. यात भाजपकडून अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे तर वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांच्या व्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवार आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे अपक्ष निवडणूक लढत आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निवडणूक रिंगणातील ७ उमेदवार 

अक्षय कर्डिले (भाजप) 

गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) 

संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी)

रावसाहेब खेवरे (अपक्ष)

सूर्यभान लांबे (अपक्ष)

महेश हापसे (अपक्ष)

अथर्व म्हसे (अपक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here