Assembly Election : नगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Assembly Election) २०२४ ची मतमोजणी (Vote Counting) २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे (Election Commission of India) मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील’- संजय शिरसाट
मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती
अकोले विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक हौलिनलाल गौईटे, (संपर्क अधिकारी – उर्ध्व प्रवरा उपविभाग कार्यकारी अभियंता प्रदिप हापसे), संगमनेरसाठी सुनिल सिंग (संपर्क अधिकारी – उर्ध्व प्रवरा उपविभाग कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे), शिर्डीसाठी कविथा रामू (संपर्क अधिकारी – सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे), कोपरगावसाठी शेरी (संपर्क अधिकारी – रचना सहायक किरण जोशी), श्रीरामपूर साठी अरूण कुमार (संपर्क अधिकारी – मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलम), आणि नेवासा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जे. एल. बी. हरि प्रिया (संपर्क अधिकारी – विस्तार अधिकारी बी.के.कासार), यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : आमदार मोनिका राजळे यांच्यावर जमावाकडून दगडफेक
अशी असणार नियुक्ती (Assembly Election)
शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून रंजिता (संपर्क अधिकारी – मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियां सायली पाटील व धनश्री शिंदे), राहूरीसाठी केशव हिंगोनिया (संपर्क अधिकारी – सहायक प्राध्यापक आर.आर.निरगुडे), पारनेर साठी सुरेंदर सिंग (संपर्क अधिकारी –कुकडी पाटबंधारे विभागाचे घोरपडे), अहमदनगर शहरसाठी ताय काये (संपर्क अधिकारी – सहायक अभियंता संदिप कुंभार), श्रीगोंदासाठी डी रथ्ना (संपर्क अधिकारी सहायक गटविकास अधिकारी विजय गायकवाड), उपविभागीय अभियंता बबन वाळके, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून पुजा यादव (संपर्क अधिकारी – मुख्याधिकारी अजय साळवे, पुरवठा निरीक्षक वृषाली जाधव, यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निरीक्षक समन्वयक अधिकारी दीपक दातीर यांनी दिली आहे.