Assembly Elections : नगर : लाेकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) मतदानाची प्रक्रिया पार पडताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका (Election) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची चिन्हे आहेत.
हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल
महाराष्ट्र व हरियाणा एकाच वेळी
महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक २००९ पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत.
अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले
२१ ते २६ ऑक्टोबरला मतदानाची शक्यता (Assembly Elections )
वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र, हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, २१ ते २६ ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल.