Assembly Elections : नगर शहरात आघाडीत बिघाडी

Assembly Elections : नगर शहरात आघाडीत बिघाडी

0
Assembly Elections : नगर शहरात आघाडीत बिघाडी
Assembly Elections : नगर शहरात आघाडीत बिघाडी

Assembly Elections : नगर : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections) महाविकास आघाडी मोठी बंडखोरी पहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांचे नाव जाहीर झालेले असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena UBT) जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीतील बंडाळी समोर आली आहे.

अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार

बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल

नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) गटाने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारीची दिवशी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच अपक्ष सुवर्णा कोतकर यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर शिवसेनेचे शशिकांत गाडे यांचा अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे आता नगर शहरात तिरंगी लढत होणार असून महायुतीकडून आमदार संग्राम जगताप तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर तर अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांच्यात लढत होणार आहे. नगर शहरात आता तिरंगी लढत होणार का? गाडे हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणारा याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

शशिकांत गाडे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात (Assembly Elections)

नगर शहर विधानसभा मतदार संघात २७ उमेदवारानी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागारीच्या दिवशी दहा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. यामध्ये कुणाल भंडारी, मदन आढाव, विजयकुमार गोविंदराव ठुबे, गोरक्षनाथ दळवी, शोभा बडे, किरण काळे, वसंत लोढा, सुवर्णा कोतकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे.तर महायुतीकडून संग्राम जगताप तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर अपक्ष म्हणून शशिकांत गाडे हे ही निवडणूक रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here