Assembly Elections : संगमनेर : विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवासानंतर माघार घेण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक होता. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी बंडखोरी थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात (Sangamner Assembly Constituency) एकूण १६ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील एक अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. माघारीच्या दिवशी दोघांनी माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. तर कॉंग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली अमोल खताळ पाटील यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
१६ जणांकडून अर्ज दाखल
ऑल इंडिया फोरवर्ड क्लोक या पक्षातून भागवत धोंडीबा गायकवाड, वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल अजीज अहमद शरीफ ओहोरा, अपक्ष अजय गणपत भडांगे, बहुजन समाज पक्षाकडून सूर्यभान बाबुराव गोरे, इंडियन नॅशनल कॉंग्रेस पक्षाकडून विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडून शशिकांत विनायक दारोळे, समता पार्टी कडून भारत संभाजी भोसले, अपक्ष विठ्ठल रावसाहेब घोरपडे, अपक्ष दत्तात्रय रावसाहेब ढगे, अपक्ष अल्ताफ इब्राहीम शेख, जयहिंद जयभारत राष्ट्रीय पार्टी कडून अविनाश हौशीराम भोर, भारतीय नवजवान सेना पक्ष काळीराम बहिरू पोपळघट, राष्ट्रीय समाज पक्षाकडून रभाजी गिरजू खेमनर, शिवसेना अमोल धोंडीबा खताळ, लोकशाही पार्टीकडून प्रदीप विठ्ठल घुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून योगेश मनोहर सूर्यवंशी अशा १६ जणांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते.
१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात (Assembly Elections)
संगमनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रभाजी गिरजू खेमनर व अपक्ष असलेले विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांनी अर्ज मागे घेतले असून अपक्ष अल्ताफ इब्राहीम शेख यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता. त्यामुळे आता १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर इंडियन नॅशनल कॉंग्रेस पक्षाकडून विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात आणि शिवसेनेचे अमोल धोंडीबा खताळ यांच्यात खरी लढत होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष संगमनेर विधानसभेकडे लागले आहे.