Assembly Elections : संगमनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार?

Assembly Elections : संगमनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार?

0
Assembly Elections : संगमनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार?
Assembly Elections : संगमनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार?

अमोल मतकर

Assembly Elections : संगमनेर : राज्याच्या राजकारणात (Politics) अहमदनगर जिल्ह्याला महत्वाचे स्थान आहे. या जिल्ह्यात राज्यातील दोन बड्या नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections) राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. या मतदारसंघांमध्ये या दोघांव्यतिरिक्त कुणाचाही फारसा प्रभाव आतापर्यंत कधीही नव्हता. मात्र, मागील काही वर्षांपासून विखे कुटुंबाची संगमनेर विधानसभा मतदारसंघात घातलेले लक्ष पाहता यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे बोलले जाते.

Assembly Elections : संगमनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार?
Assembly Elections : संगमनेर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होणार?

नक्की वाचा: ‘काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये’- संजय राऊत

भाजप संगमनेरमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील

संगमनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि शिवसेनेत चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार ​​बाळासाहेब भाऊसाहेब थोरात १,२५,३८० मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना पक्षाचे उमेदवार साहेबराव रामचंद्र नवले यांचा पराभव झाला होता. आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. नेहमी शिवसेनेला उमेदवारी मिळत असताना या निवडणुकीमध्ये भाजप संगमनेरसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळणार? याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे.

अवश्य वाचा: मोठी बातमी! राज्यात दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार

सुजय विखे पाटील यांची संगमनेरमधून लढण्याची इच्छा (Assembly Elections)

संगमनेरमध्ये गेल्या आठ निवडणुकांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनीच विजयाची पताका फडकावलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभेत लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. तर भाजप संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून जनार्दन आहेर तर अपक्ष म्हणून अविनाश भोर हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार आहेत.


आतापर्यंत शिवसेनेचा दावा असलेला संगमनेर तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व जास्त नसले तरी शिवसेना ही जागा भाजपला एवढ्या सहज सोडेल का? असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. भाजप व शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी संगमनेरातून अनेक जण थोरातांविरोधात लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. यंदा संगमनेर विधानसभा मतदारसंघात नेहमीपेक्षा वेगळे चित्रं असेल असे अनेकांना वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून काही ग्रामपंचायतवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असताना जवळपास 25 ग्रामपंचायतवर यंदा भाजपच्या ताब्यात असून महाविकास आघाडीसमोर भारतीय जनता पार्टीचा निभाव लागणार का हे पाहणं महत्त्वाचे आहे. विळा भोपळ्याचे नाते म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेले पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी थोरात – विखे यांच्यातील राजकीय लढाई आता अस्तित्वाची लढाई बनली आहे, हे मात्र खरं!


संगमनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ७१.७२ टक्के मतदान झाले. एकूण २ लाख ६९ हजार ६८९ मतदारांपैकी १ लाख ९३ हजार ४२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १ लाख २५ हजार ३८० मते आमदार थोरात यांना मिळाली. त्यात थोरातांनी ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे. आतापर्यंत काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचाच उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहत होता. मात्र, नेहमीच पराभव पत्करावा लागल्याने यावेळेस संगमनेर विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here