Assembly Elections : राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता 

Assembly Elections : राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता 

0
Assembly Elections : राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता 
Assembly Elections : राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता 

अनिल देशपांडे

Assembly Elections : अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीला सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार लागले आहेत. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP Sharadchandra Pawar) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांना विरोधकांतर्फे कोण लढत देणार, हा प्रश्न अद्याप स्पष्ट झालेला नाही. लढतीत अनेक उमेदवार असले तरी मुख्य लढाई दुरंगी होईल, अशी चिन्हे आहेत. विरोधात महायुतीतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबतीत भारतीय जनता पक्षात (BJP) उमेदवारांत रस्सीखेच आहे, असे चित्र आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार    

मतविभागणी न झाल्याचा प्राजक्त तनपुरे यांना फायदा

मागच्या निवडणुकीत पडद्याआड काही घडामोडी घडल्या होत्या. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार कर्डिले यांना बसला, याची अनेक दिवस चर्चा होती. तर लढत दुरंगी झाल्याने मतविभागणी न झाल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांना मिळाला आणि पंधरा वर्षांनंतर तनपुरे यांचा बालेकिल्ला त्यांच्या ताब्यात आला. महाविकास आघाडीत त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली. मिळालेल्या मंत्रीपदाचा फायदा मतदारसंघात झाला. अनेक प्रकल्प मार्गी लागले. पाच वर्षे मंत्रीपद राहील असे वाटत असतानाच अचानक मंत्रीपद गेले. निळवंडे, वांबोरी चारी अन्य विकासकामांच्या आधारावर आमदार तनपुरे जनतेसमोर जाणार आहेत.

अवश्य वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

पराभूत झाल्यानंतरही कर्डिलेंचा संपर्क कायम (Assembly Elections)

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पराभूत झाल्यानंतरही मतदारसंघात संपर्क ठेवला. वैयक्तिक संपर्काची त्यांची मोहीम सुरू होतीच. त्यामुळे महायुतीत तेच दावेदार असतील, असे समजले जात होते. मात्र, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी त्यांचे पूत्र माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी निवडणूक तयारी सुरू करा. पक्षाची उमेदवारी मिळविण्याचे माझ्यावर सोपवा, असे जाहीर विधान केल्याने उमेदवारी नक्की कोण मिळवणार, या बाबतीत शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्हीही इच्छुक गट आपापल्या परीने निवडणूक तयारी करीत आहेत. यापैकी एकाला उमेदवारी मिळाली तर अन्य गटाची भुमिका पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी तितकीच सक्रिय सहभागाची राहणार का, हा एक प्रश्नच आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते रावसाहेब खेवरे यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निवडणूक इच्छुकांची स्पर्धा पक्ष व महायुती कशी हाताळणार हा कळीचा मुद्दा बनू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद लोकसभा निवडणुकीच्या विजयाने वाढलेली आहे. गत विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांना तत्कालीन खासदारांनी मदत केली की नाही, याबाबतीत परस्परविरोधी दावे बरेच दिवस केले जात होते. आता मात्र पक्षाच्या खासदारांची भक्कम साथ त्यांच्यासोबत आहे. पाच वर्षात अँन्टिइनकमबन्सी “प्रस्थापित विरोधी मते “याची आपल्याला मदत होईल अशी विरोधकांना आशा वाटते आहे. मध्यंतरी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण ही या मतदारसंघात इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना त्यांच्या विधानाचा खुलासा करावा लागला. आपण या मतदारसंघात स्पर्धेत नाही, असे त्यांनी सांगितले.

Assembly Elections : राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता 
Assembly Elections : राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता 

युवा नेते राजाभाऊ शेटे यांनी ही आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. त्यांचा तालुक्यात चांगला संपर्क आहे. माध्यमात त्यांची चर्चा मोठी असली तरी वास्तवतः काय परिस्थिती असेल यासाठी थांबावे लागेल. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना २५ हजाराचे मताधिक्य होते. मागील लोकसभा निवडणुकीत हे मताधिक्य ७१ हजाराचे होते. मताधिक्याचा हा वारु मतदारांनी रोखला होता. मात्र, दोन्हीही निवडणुकीतील मतदारांचे मतदानासाठीचे निकष वेगवेगळे असतात. लोकसभा निवडणुकीनंतरच्या परिस्थितीत आपल्याला अनुकूल वातावरण असल्याचा दावा दोन्हीही उमेदवार करीत आहेत. राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, मोफत वीज पुरवठा अशा घटकांचा मतदारसंघात काय परिणाम होणार, याची माध्यमातून चर्चा आहे.