Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ

Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ

0
Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ
Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ

Assembly Elections : अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly Elections) निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३ हजार ७६३ मतदान केंद्रांसाठी (Polling Station) द्यावयाच्या ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची (Voting machine) पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली.

Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ
Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ

नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, ईव्हीएम समन्वयक शारदा जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार

४ हजार ८८७ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (Assembly Elections)

जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ४ हजार ५१२ बॅलेट युनिट, ४ हजार ५१२ कंट्रोल युनिट आणि ४ हजार ८८७ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ
Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची सरमिसळ

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातदेखील मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.