Assembly Elections : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न

Assembly Elections : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न

0
Assembly Elections : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न
Assembly Elections : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न

Assembly Elections : अहिल्यानगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Assembly Elections) अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) क्षेत्रनिहाय सरमिसळ जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

संगणकीय प्रणालीद्वारे सरमिसळ

अहिल्यानगर जिल्ह्यांतर्गत बारा विधानसभा क्षेत्रासाठी ४ हजार ९३२ मतदान केंद्राध्यक्ष, ४ हजार ७६१ प्रथम मतदान अधिकारी तसेच ४ हजार ९०१ पुरुष व ६ हजार २१५ महिला अशा इतर मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार

अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार (Assembly Elections)

या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मनुष्यबळ व्यवस्थापन समन्वयक अतुल चोरमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर उपस्थित होते. सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिले प्रशिक्षण देण्यात येणार आहे.