Assembly Elections : विधानसभा निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी : निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन

Assembly Elections : विधानसभा निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी : निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन

0

Assembly Elections : नगर : निवडणूक (Assembly Elections) प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक (Elections) प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशीलपणे पार पाडत समन्वयाने काम करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन (Gyan Chand Jain) यांनी दिल्या.

नक्की वाचा: महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याची जबाबदारी आता आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर

कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित

जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडजोडे उपस्थित होते.

अवश्य वाचा: दागिन्यांसाठी नातवानेच केला आजीचा खून

ग्यानचंद जैन म्हणाले, (Assembly Elections)

भारतीय लोकशाहीला जगात महत्व आहे. देशामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका  मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या गेल्या. भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकसंघपणे तसेच जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Assembly Elections : विधानसभा निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी : निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन
Assembly Elections : विधानसभा निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी : निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला ४० लक्ष रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. उमेदवाराच्या प्रत्येक खर्चावर बारकाईने नजर ठेवावी. ईएसएमएस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करत अवैध मद्य, रोकड वाहतुकीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांनी करडी नजर ठेवावी. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंद होईल, यादृष्टीने सर्व पथकांनी काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस निवडणुक खर्च निरीक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.