Assembly Elections News | अहिल्यानगर जिल्ह्यात २५९ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध; ३० अर्ज अवैध

0
Assembly Elections
Mahayuti : श्रीरामपुरातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना

Assembly Elections News | नगर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) बुधवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस होता. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीनंतर २५९ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरवण्यात आले तर ३० उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. 

नक्की वाचा: ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही’- देवेंद्र फडणवीस

अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र होणार स्पष्ट

जिल्ह्यातील १२ मतदारसंघातून २८९ जणांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. बुधवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजेपर्यंत प्रशासनाकडून अर्ज छाननीची प्रक्रिया तसेच त्यानंतर हरकती व त्यावरील सुनावणी झाली. यात ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर २५९ जणांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अवश्य वाचा: विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मतदारसंघ निहाय अर्ज वैध उमेदवारांची संख्या

(कंसात अवैध उमेदवारांची संख्या)

अहमदनगर शहर – २४ (३)

अकोले – १२ (१)

संगमनेर – १५ (१)

शिर्डी – १२ (३)

कोपरगाव – १९ (१)

श्रीरामपूर – २८ (३)

नेवासा – २४ (०)

शेवगाव – २७ (९)

राहुरी – २४ (३)

पारनेर – २० (१)

श्रीगोंदा – ३१ (५)

कर्जत-जामखेड – २३ (०)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here