Atlee And Salman Khan Film: दिग्दर्शक ॲटली बनवणार सलमान खानसोबत चित्रपट

ॲटली आणि सलमान खान दोघेही या आगामी चित्रपटावर एकत्र काम करत आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून सलमान खानला या आगामी चित्रपटासाठी मोठं मानधन मिळणार आहे.

0
Atlee And Salman Khan Film: दिग्दर्शक ॲटली बनवणार सलमान खानसोबत चित्रपट
Atlee And Salman Khan Film: दिग्दर्शक ॲटली बनवणार सलमान खानसोबत चित्रपट

Salman Khan नगर : २०२३ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये दिग्दर्शक ॲटलीचा (Director Atlee) ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाचा समावेश केला जातो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात १००० कोटींहून अधिकची कमाई केलेली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून ॲटलीने बॉलिवूड डेब्यू केलं होतं. आता दिग्दर्शक ॲटली खान भाईजानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच दिग्दर्शक ॲटलीने सलमान खानसोबतच्या (Salman Khan) आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू

दिग्दर्शक ॲटली आणि सलमान खान झळकणार सोबत (Atlee And Salman Khan Film)

माहितीनुसार, ॲटली आणि सलमान खान दोघेही या आगामी चित्रपटावर एकत्र काम करत आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून सलमान खानला या आगामी चित्रपटासाठी मोठं मानधन मिळणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला पुढच्या वर्षापासून सुरूवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिग्दर्शक ॲटली या आगामी चित्रपटाची स्क्रीप्ट लॉक करण्यात व्यग्र आहे. चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली करणार आहे.

अवश्य वाचा : सांदण दरी परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री,वन विभागाचा मोठा निर्णय

ॲटली आणि सलमान खानच्या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. ॲटलीला हा चित्रपट टॉलिवूड सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत करण्याची इच्छा होती. मात् अल्लू अर्जुनकडे अनेक प्रोजेक्ट होते. असल्यामुळे त्याला या चित्रपटासाठी वेळ नव्हता नव्हता. अशा परिस्थितीत ॲटलीने एक नवीन स्क्रिप्ट तयार करत आता सलमान खानसोबत आगामी चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here