ATM charge:मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार 

0
ATM charge:मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार 
ATM charge:मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार 

ATM charge : एटीएममधून वारंवार पैसे काढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ मे २०२५ पासून, मोफत मर्यादेनंतर एटीएममधून (ATM) पैसे काढणे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम शुल्कात वाढ (Increase in ATM charges) करण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर पैसे काढताना तुमच्या खिशावर थोडा जास्त भार पडणार आहे.

नक्की वाचा : भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार  

एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क किती वाढलं ?(ATM charge)

आतापर्यंत, मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी २१ रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र १ मे २०२५ पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी २३ रुपये द्यावे लागतील. म्हणजेच जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळी २ रुपये जास्त द्यावे लागतील. जे लोक महिन्यातून अनेक वेळा पैसे काढण्यासाठी एटीएम वापरतात त्यांच्यासाठी हा खर्च वाढणार आहे.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट;कांद्याच्या दरात मोठी घसरण  

मोफत मर्यादेबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा की,ग्राहक अजूनही दरमहा त्यांच्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा मोफत व्यवहार करू शकतात. याशिवाय, इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ३ वेळा मोफत व्यवहारांची सुविधा मेट्रो शहरांमध्ये आणि ५ वेळा मोफत व्यवहारांची सुविधा नॉन-मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळेला पैसे काढले तरच नवीन शुल्क लागू होईल.

लहान बँकांच्या ग्राहकांवर जास्त परिणाम (ATM charge)

एटीएम शुल्कात वाढ झाल्याने सर्वात जास्त परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होईल,असे तज्ज्ञांचे मत आहे. लहान बँकांकडे कमी एटीएम असतात आणि ते मोठ्या बँकांच्या नेटवर्कवर अवलंबून असतात.अशा परिस्थितीत, जर मोफत व्यवहाराची मर्यादा संपली तर या ग्राहकांना प्रत्येक वेळी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, जास्त शुल्क टाळण्यासाठी, काही ग्राहक त्यांची बँक बदलण्याचा विचार करू शकतात. जेणेकरून ते अधिक वारंवार मोफत व्यवहारांची सुविधा मिळवू शकतील.