ATS | नगर : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यभरातील चौदा ठिकाणी छापेमारी केलीय. त्यात अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सात ठिकाणी ही छापेमारी झाली. काही तरुण हे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई एटीएसने केली. या प्रकरणात अनेकांकडे चौकशी केली जात आहे. चौकशीसाठी १४ जणांना ताब्यात घेतले आहे मात्र, अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
हे वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते
एटीएसने राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या
या कारवाईबाबत एएनआयने एक्सवरून वृत्त दिलंय. एटीएसने राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. यवतमाळमधील पुसद आणि उमरखेडमधील चौदा ठिकाणी छापेमारी केलीय. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरसह इतर सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. दहशतवादी संघटनांशी काही जण संपर्कात असल्यावरही एटीएसही ही शोध मोहीम सुरू केली.
अवश्य वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते
१४ संशयितांना घेतले ताब्यात
अहिल्यानगरमधील कारवाईच्या वेळी तलवारी जप्त करण्यात आल्या. आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तपासले जात आहे. अहिल्यानगरमधून १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या कारवाईत आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. संशयितांची सविस्तर चौकशी सुरू असल्याचे एटीएसकडून सांगण्यात येत आहे. या कारवाईसाठी एटीएसने स्थानिक पोलिसांची मदत घेतली आहे.
हे पहा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय! थान्या नाथन नेमक्या कोण ?
उत्तर प्रदेशमधील छंगूर बाबा कनेक्शनबाबत तपास
उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कथित धर्मांतर रॅकेटच्या चौकशीच्या संदर्भात छंगूर बाबाचा जवळचा सहकारी इधू इस्लाम याला नागपूर येथून अटक केली होती. स्थानिक पोलीस, महाराष्ट्र एटीएस आणि यूपी एटीएस यांच्या संयुक्त पथकाने ही अटक झाली होती. कथित धर्मांतर नेटवर्कसाठी निधी आणि रसद हाताळण्यात इधु इस्लामने महत्त्वाची भूमिका बजावली. या कनेक्शन आहे का याबाबत चौकशी सुरू आहे.



