Attack : नगर तालुका: शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे गोरक्षकावर खुनी हल्ला (Attack) घडला होता. यात गोरक्षक गंभीर जखमी झाले होते. सदर घटनेनंतर शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित गुन्ह्याची (Crime) तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने तपास सुरु केला होता. तपासादरम्यान दोन्ही आरोपी (Accused) पळून जाण्याचा तयारीने गावाच्या बाहेर स्टँडवर उभे असल्याचे पथकाला समजले. पथकाने तत्काळ तिथे जावून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : अहमदनगरचं नामांतर आता ‘अहिल्यानगर’ हाेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
लोखंडी रॉड, लोखंडी सत्तुरने मारहाण करुन गंभीर जखमी (Attack)
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रवींद्र भीमा गायकवाड (वय 30, रा. नाथनगर, पाथर्डी, ता. पाथर्डी) हे तसेच त्यांचेसोबत इतर गोरक्षक यांना अमरापूर येथील कुरेशी मोहल्ला येथे गोवंशीय जनावरांची कत्तल होत असलेबाबत माहिती मिळाल्याने ते कुरेशी मोहल्ला येथे गेले असता आरोपी राजू कुरेशी व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यास जिवे ठार मारण्याचे उद्देशान लोखंडी रॉड, लोखंडी सत्तुरने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हे देखील वाचा : काँग्रेसच्या विनायक देशमुखांचा भाजपत प्रवेश
आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात (Attack)
सदर गुन्ह्यातील आरोपी अलताब सय्यद व त्याचा एक साथीदार हे अमरापूर गावामधून पळून जाण्याच्या तयारीत स्टँडवर उभे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवून आरोपींना ताब्यात घेणेबाबत सूचना दिल्या. पथकाने तात्काळ अमरापूर गावातील स्टँडवर जाऊन खात्री करता सदर ठिकाणी दोन इसम संशयित रित्या वाहनाची वाट बघताना दिसून आले. त्यावेळी पथकास सदर दोन्ही इसमांचा संशय आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अल्तमश बशीर शेख (वय 23, रा.अमरापूर, ता. शेवगाव), अलताब तैय्यब शेख (वय 26, रा. अमरापूर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस करता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना शेवगांव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.