Attack : नागरदेवळेतील युवकावर हल्ला करणारे सहा आरोपी गजाआड

Attack : नागरदेवळेतील युवकावर हल्ला करणारे सहा आरोपी गजाआड

0
Attack
Attack : नागरदेवळेतील युवकावर हल्ला करणारे सहा आरोपी गजाआड

Attack : नगर : नागरदेवळे (ता. नगर) येथील युवकाला काल (सोमवारी) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जमावाने हल्ला (Attack) करत जखमी केले होते. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना (Hindutva organization) आक्रमक झाल्या होत्या. माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी जिल्हा पोलीस (Police) अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने २४ तासांच्या आत सहा हल्लेखोर आरोपींना ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल

पूर्ववैमनस्यातून पुष्करवर हल्ला (Attack)

सोहेल चाँद शेख (वय २६), शोएब चाँद शेख (वय २६), शोएब हमीद सय्यद (वय २३), अमीन हुसेन पठाण (वय २१), साहील अकबर पठाण (वय २८), रियाज मुनीर पठाण (वय ३०, सर्व रा. नागरदेवळे, ता. नगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. पुष्कर शेलार हा युवक त्याच्या मित्रांसह किरणा दुकानातून वस्तू घेऊन घरी निघाला होता. त्यावेळी पूर्ववैमनस्यातून जमावाने पुष्करवर हल्ला केला. त्याला तलवार व लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या मित्रांनाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली.

नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल (Attack)

जखमी पुष्करवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात पुष्करने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने नागरदेवळे येथे आरोपींचा शोध घेतला. मात्र, आरोपींचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड जात होते. अखेर पथकाने नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात आरोपींच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यांना कळाले की, एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण लपून बसले आहेत. त्यानुसार पथकाने छापा टाकत आरोपींना ताब्यात घेतले. जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here