Attack : नगर : पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील वकील (lawyer) मयूर अशोक कोल्हे व त्यांचे वडील ॲड. अशोक कोल्हे हे नगर येथील जुन्या न्यायालयात न्यायालयीन कामानिमित्त काल (ता. ८) आले होते. त्यावेळी सायंकाळी ४.३५ वाजता अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. गांधीनगर, बोल्हेगाव, नगर) याने जीवघेणा हल्ला (Attack) केला. यात अशोक कोल्हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील आरोपी अनिल गायकवाडला कोतवाली पोलिसांनी (Police) आज पहाटे अटक केली.
हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल
डोक्याला गंभीर दुखापत
अनिल गायकवाडने केलेल्या हल्ल्यात अशोक कोल्हे यांच्या गाल व डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी कोल्हेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वकिलांवर हल्ला झाला त्यावेळी शहरात पोलीस प्रशासन निवडणुकीच्या बंदोबस्तात होते.
नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ
आरोपी सराईत गुन्हेगार (Attack)
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपीला अटक करण्याच्या सूचना कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी तपास केला असता अनिल गायकवाड हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. कोतवाली पोलिसांनी वकील पिता-पूत्र असलेल्या कोल्हेंकडून जबाब घेत जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा आज पहाटे दाखल करून घेतला. गुन्हा दाखल होताच आज पहाटे कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली.