Attack : निघोज येथील हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला

Attack : निघोज येथील हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला

0
Attack : निघोज येथील हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला
Attack : निघोज येथील हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला

Attack : पारनेर : निघोज येथे काल (ता. २) हॉटेल मालक प्रवीण भुकन, गणेश भुकन, ओंकार रसाळ व हॉटेल कामगार यांच्यावर पठारवाडी येथील आदिनाथ मच्छिंद्र पठारे, विशाल खंडू पठारे, शंकर केरू पठारे, धोंड्या जाधव, प्रथमेश सोनवणे यांनी किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला (Attack) केला, अशी फिर्याद (Complaint) गणेश भुकन यांनी पारनेर पोलीस (Police) ठाण्यात दिली आहे.

नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

फिर्यादीत म्हटले आहे की,

निघोज येथे काल (ता.२)  रात्री अकराच्या सुमारास पठारवाडी येथील आदिनाथ मच्छिंद्र पठारे, विशाल खंडू पठारे ,व शंकर केरू पठारे आले व त्यांनी जेवणाची मागणी केली. हॉटेलमधील ओंकार रसाळ यांनी त्यांना ११ वाजलेत त्यामुळे हॉटेल बंद झाले, असे सांगितले. तेव्हा आदिनाथ पठारे यानी सांगितले की, तुला जेवण द्यावेच लागेल नाहीतर मी राडा करेन असे धमकावले.

अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

जेवण व्यवस्थित नाही, असे म्हणून जीवघेणा हल्ला करत शिवगाळ (Attack)

ओंकारने जेवण देण्यास सांगितले. त्यानंतर जेवण करत असताना आदिनाथ याने जेवण व्यवस्थित नाही, असे म्हणून जेवण करत असताना मोठ्याने शिव्या देण्यास सुरुवात केली. तेव्हा हॉटेलच्या बाहेर उभा असलेला प्रवीण भुकन हा आत आला. त्याने त्यांची समजूत काढून रात्री पावणे बारा वाजतेच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर काढून दिले. गणेश भुकन यांनी निघोज येथील पोलिसांना याबाबत कळविले. रात्री १२ वाजेच्या सुमारास प्रवीण, ओंकार व हॉटेलमधील कामगार सर्व हॉटेलमध्ये असताना अचानक आदिनाथ पठारे, धोंड्या जाधव, शंकर पठारे, विशाल पठारे, प्रथमेश सोनवणे हे हॉटेलमध्ये आले. त्यांच्या हातात तलवार, कोयता, पाईप, दांडा अशी हत्यारे होती. त्यांनी हॉटेलमधील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करत शिवगाळ केली. पोलीस येताच आरोपी पसार झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात हॉटेलमधील एक लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here