Attack : कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Attack : कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

0
Attack : कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा
Attack : कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा


Attack : नगर : पूर्ववैमनस्यातून एकाने भाऊबंदाच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला (Attack) करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने (District Court) आज (ता. १३) तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. दंड न भरल्यास पुढील तीन महिन्यांसाठी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. गणेश बाबासाहेब क्षीरसागर (वय ३७, रा. घोटण, ता. शेवगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी.के. मुसळे यांनी काम पाहिले.

नक्की वाचा: आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार

जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा

घोटण (ता. शेवगाव) येथे १६ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री साडेसात वाजता चंद्रकांत बाबूराव क्षीरसागर यांच्या घराजवळील दुकानासमोर गणेश क्षीरसागर आला. तो चंद्रकांतला उद्देशून म्हणाला की, “तुझ्या विरोधात दाखल केलेली केस मी मागे घेतो. तू मला पैसे दे.” मात्र, चंद्रकांतने याला नकार दिला. चिडलेल्या गणेशने कुऱ्हाडीने चंद्रकांतवर हल्ला केला. यात चंद्रकांतच्या डोक्याला मार लागला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चंद्रकांत क्षीरसागर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. 

अवश्य वाचा: येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना

न्यायालयाने तपासले आठ साक्षीदार (Attack)

या खटल्यात न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. यात चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. तुषार कोहक, तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार योगेश शेळके यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे गणेश क्षीरसागरला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.