Attack : महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

Attack : महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

0
Attack : महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला
Attack : महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

Attack : श्रीरामपूर : अवैध (Illegal) वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला (Attack) केल्याची घटना श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोंडेगाव परिसरात घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाच्या शासकीय कामात अडथळा

उंबरगावचे ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र थोरात यांनी याबाबत फिर्यादीत म्हंटले आहे की, तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशान्वये गौण खनिज भरारी पथक नेमून तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्राच्या परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेलो असताना, विना नंबरचा विटकरी रंगाचा वाळूने भरलेला डंपर व वाळूने भरलेला डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना त्याठिकाणी दिसले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत असताना ज्ञानेश्वर उर्फ माऊली किसन जाधव (शिरसगाव), विकी जयराम लुंड (टाकळीभान), महेश सुरेश साठे, गणेश ज्ञानेश्वर सातपुते (तीनवाडी, हरेगाव), कुणाल पूर्ण नाव माहित नाही, बबन जाधव (शिरसगाव) व त्यांच्यासोबत आणखी ३० ते ३५ अनोळखी इसम त्यांच्याकडील चारचाकी वाहने व मोटरसायकली घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी कारवाई करत असलेल्या पथकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attack)

तसेच डंपर चालक ज्ञानदेव साळुंखे याने डंपर खोल चारीत पलटी करून, त्यात बसलेले फिर्यादी व सुरेंद्र पवार यांना व पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो डंपर मधून उडी मारून पळून गेला. तसेच जमलेल्या लोकांनी पथकातील कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सोडू नका, त्यांना इथून जाऊ द्यायचे नाही असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पथकाच्या दिशेने दगडफेक केली. शासकीय पोलीस वाहनाचे नुकसान केले. विना नंबरचा डंपर चालक विशाल अशोक बेहेरे याने यातील वाळू जागेवर खाली करून डंपर पळून नेला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.