Attack : पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला…

Attack : पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला…

0
Attack : पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला…
Attack : पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला…

Attack : पुणे : पुणे (Pune) शहरातील तळजाई टेकडी परिसरात आज सकाळी पोलीस भरतीची (Police Recruitment) तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर १५ ते २० जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Attack : पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला…
Attack : पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला…

नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप  

विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करण्यासाठी विद्यार्थी तळजाई टेकडीवर जमले होते. मात्र, आज सकाळी सराव सुरु असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टोळक्याने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत धक्काबुक्की केली, तसेच अश्लील शिवीगाळ करत महिलांकडे पाहून अश्लील हावभाव केले.

अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश  

पोलीसच असुरक्षित झाल्याचे चित्र (Attack)

दरम्यान, या हल्ल्यात एक पोलीस कॉन्स्टेबल, जो स्वतः पीएसआय परीक्षेची तयारी करत होता, तो गंभीर जखमी झाला असल्याने पोलीसच असुरक्षित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हल्लेखोरांकडून गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना त्रास देणे, धमक्या देणे आणि अश्लील वर्तन केल्याचेही उघड झाले असून आज थेट हिंसक हल्ल्यात रूपांतर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान,या प्रकारामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, त्याच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून सुरक्षिततेचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.