Attack : नगर : मित्राला वाचविण्यास गेलेल्या एका युवकावर कोयता, लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला (Attack) केल्याची घटना सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पडका महाल परिसरात घडली आहे. सक्षम पदमाकर नवघरे (वय १८, रा. भूषण नगर, केडगाव, अहिल्यानगर) असे जखमी (Injured in Attack) युवकाचे नाव असून त्याच्यावर रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहे.
अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जबाबावरून सात जणांविरूध्द सोमवारी (ता. ६) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉय सोनवणे, अनुज बोरूडे, जॉकी ऊर्फ धिरज, साहिल दर्कर, अमन वाबळे, पिंट्या बकासुर व भोऱ्या (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाहीत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मारहाण करून जिवे मारण्याची धमकी (Attack)
फिर्यादी रविवारी (ता. ५) दुपारी सक्षमला त्याचा मित्र नयन खेचे याचा फोन आला. नयन यास पडका महाल, बारस्कर टपरी येथे मारहाण झाल्याची माहिती त्याने दिली. यावरून सक्षम तत्काळ दुचाकीवरून तेथे पोहोचला असता नयन खेचे हा मारहाणीत जखमी अवस्थेत होता. सक्षमने नयनला आपल्या दुचाकीवर बसवून तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता, त्याचवेळी नयनवर हल्ला करणारे संशयित आरोपी पुन्हा तेथे आले. सक्षमवर कोयता, लोखंडी रॉड व दगडाने हल्ला केला, शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.