नगर : पश्चिम बंगालमधून (West Bengal) एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) पथकावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एनआयएच्या पथकावर जमावाकडून अचानक दगडफेक करून पथकातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये एनआयएच्या पथकातील दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : ऋतुराजच्या चेन्नईला सनरायझर्स हैदराबादने केलं चीतपट
नेमके प्रकरण काय ? (Attack On NIA Team)
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांचा मुत्यू झाला होता. यासंदर्भातील तपास एनआयएकडून सुरु असून यासाठी भूपतीनगर येथे आलेल्या पथकावर संतप्त जमावाकडून हल्ला करण्यात आला. ही घटना आज ६ एप्रिल रोजी पहाटे घडली. यावेळी दगडफेक करत अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेत दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
अवश्य वाचा : ‘या’ चळवळीमुळे काँग्रेसला बसला होता पराभवाचा धक्का
एनआयएच्या पथकावर जमावाचा हल्ला (Attack On NIA Team)
पथकावर हल्ला झालेल्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात काहींना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर एनआयएचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला.