Indapur Tehsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले 

इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला.

0
Indapur Tehsildar Attack
Indapur Tehsildar Attack

नगर : पुणे जिल्ह्यातील गुन्ह्यांची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता जिल्ह्यातील इंदापूरमध्ये (Indapur Crime)क धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील (Tehsildar Shrikant Patil) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या शासकीय गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांच्यावर मिरचीची पूड ही टाकली गेली आहे. सुदैवाने या हल्ल्यात श्रीकांत पाटील बचावले आहे.

नक्की वाचा : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू

संविधान चौकात तहसीलदारांवर हल्ला (Indapur Tehsildar Attack)

इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञात हल्लेखोरांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला केला. आज (ता.२४) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. सोबत हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. मात्र तहसीलदार आणि त्यांचा चालक यातून बचावले आहेत. या घटनेत शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.  

हेही पहा : डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी उलगडून सांगितली नारदीय कीर्तनाची परंपरा

सुप्रिया सुळे यांची गृह विभागावर टीका (Indapur Tehsildar Attack)

या हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया यांनी गृहविभागावर टीका केली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरचीपूड देखील फेकली. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नसल्याचं त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here