Attempt To Break ATM : पारनेर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील बसस्थानक (Bus Stand) परिसरातील एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न (Attempt To Break ATM) चोरट्यांनी केला. शनिवारी (ता. २१) मध्यरात्री ही घटना घडली. तांत्रिक कारणामुळे पैसे (money) चोरीला न गेल्याने मोठी वित्तहानी टळली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व
गजबजलेल्या परिसरातील एटीएमला लक्ष्य
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बसस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरातील एटीएमला लक्ष्य केले. चोरट्यांनी एटीएम मशीनचा वरचा भाग मोठ्या शिताफीने तोडला. मात्र, ज्या सुरक्षित कप्प्यात (तिजोरी) रोकड साठवलेली असते, तो भाग तोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही पैसे हाती लागत नसल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला.
अवश्य वाचा : कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी मंजूर; तांबे यांच्या प्रयत्नांना यश
परिसरात खळबळ (Attempt To Break ATM)
रविवारी सकाळी ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कडूस यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू
या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. “चोरट्यांनी मशीनचे नुकसान केले असले तरी रोकड सुरक्षित आहे. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल,” असा विश्वास उपअधीक्षक शिरीष वमने यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे निघोज परिसरात रात्रीच्या गस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, व्यापाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



