Attempt to Kill : नगर : नगर-पुणे महामार्गावर (Nagar-Pune Highway) कामरगाव (ता. अहिल्यानगर) शिवारात पहाटेच्यावेळी गोरक्षकांनी संशयास्पद ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ट्रक त्यांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सतीष मोरे (वय ३२ रा. सौरभनगर, भिंगार) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न (Attempt to Kill) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; ‘राष्ट्रवादी’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे
मालवाहु ट्रक (एमएच ४६, एआर ६३८५) वरील चालक, नजीम ऊर्फ पापा गुलाब बेपारी, खालीद इब्राहीम कुरेशी (दोघे रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे) आणि फिरोज रशीद शेख (रा. घोडेगाव, ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
नक्की वाचा : किसान सभेसह विविध संघटनांची शुक्रवारी आंदोलनाची हाक
ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न (Attempt to Kill)
सतीश मोरे यांनी फिर्यादीनुसार, रविवारी (ता.५ ) पहाटे तीन वाजता अहिल्यानगर पुणे महामार्गावरून एक मालवाहू ट्रक जात असल्याचे दिसले. त्यावेळी मोरे व इतर गोरक्षकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ट्रक थांबविण्याऐवजी तो मोरे व साक्षीदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मोरे जखमी झाले. ट्रकमध्ये गोवंशीय जातीच्या १७ जर्सी गाई दाटीवाटीने भरलेल्या आढळल्या. त्यांना चारा-पाणी न देता अत्यंत क्रूर व निर्दयीपणे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. या जनावरांची एकूण किंमत सुमारे एक लाख ७० हजार तर ट्रकची किंमत १० लाख इतकी आहे. दरम्यान, या घटनेची माहिती अहिल्यानगर तालुका पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मोरे यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर दुपारी पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.