
Attempt to Kill : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या ११ जणांच्या टोळक्याने तरूणाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना समोर आली आहे. शाबीर अन्सारी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे जखमी (Injury) तरूणाचे नाव आहे.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
खूनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी जहागीर हतीम अन्सारी (वय २४, हल्ली रा. सोनेवाडी, मुळ रा. झारखंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात विशाल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्याचे १० साथीदार यांच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण (Attempt to Kill)
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपी विशाल व त्याचे सुमारे १० साथीदार हे २ मार्च रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सोनेवाडी शिवारातील निशा इंन्फ्रा स्ट्रक्चर आर. एम. सी. प्लॉट येथे आले. त्यांनी शाबीर अन्सारी यांना दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर दुखापत केली. तसेच संशयित आरोपींनी दहशत करत फिर्यादी जहागीर हतीम अन्सारी यांच्यासह इतरांना देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


