Attempt to Kill : अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन संशयित जेरबंद

Attempt to Kill : अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन संशयित जेरबंद

0
Attempt to Kill : अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन संशयित जेरबंद
Attempt to Kill : अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन संशयित जेरबंद

Attempt to Kill : नगर : गोरक्षकाच्या दुचाकीला अपघाताचा (accident) बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करणाऱ्या दोन संशयतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न

संशयित आरोपींचे नाव

फैजान अय्याश शेख (वय-२४), बबलु उर्फ असिम नजीर अहमद शेख (वय- ३०, दोघे रा.बायजाबाई जेऊर ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार अनिष इलियास कुरेशी रा. बायजाबाई जेऊर ता.जि. अहिल्यानगर), दानीश जाकीर शेख/कुरेशी रा.चांदा ता.नेवासा जि. अहिल्यानगर), शरीफ रा.सुरत (पसार), यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

गुन्हा दाखल (Attempt to Kill)

सोनई पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक संकेत हराळ याला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या वाहनांचा पाठलाग केला असता संबंधित वाहन चालकांनी अपघाताचा बनवा करून जोराची धडक देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करीत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा फैजान शेख यांनी त्याच्या साथीदार असं केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघं संशयतांना ताब्यात घेतले. चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, सोमनाथ झांबरे, विष्णू भागवत, सतीष भवर, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.