Attempted Murder : खुनाचा प्रयत्न प्रकरणातील पसार आरोपीला साताऱ्यातून अटक

Attempted Murder : खुनाचा प्रयत्न प्रकरणातील पसार आरोपीला साताऱ्यातून अटक

0
Attempted Murder : खुनाचा प्रयत्न प्रकरणातील पसार आरोपीला साताऱ्यातून अटक
Attempted Murder : खुनाचा प्रयत्न प्रकरणातील पसार आरोपीला साताऱ्यातून अटक

Attempted Murder : नगर तालुका : खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करून एकाला गंभीर जखमी (Seriously Injured) करणारा आरोपी पसार झाला होता. त्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी (Police) सातारा जिल्ह्यातील साकुर्डी येथून जेरबंद केले. निखिल शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता, ता. नगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : ‘मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण’- छगन भूजबळ

पैशाच्या व्यवहारातून वाद

१५ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बाह्यवळण रस्त्यावरील डोंगरे वस्तीजवळ त्यांच्या ओळखीचा निखिल गांगर्डे भेटला. अशोक शेळके व निखिल गांगर्डे यांचा पैशाच्या व्यवहारातून वाद झाला. त्यातून निखिल गांगर्डे याने अशोक शेळके यांच्यावर चाकूने वार केला. त्यामुळे अशोक शेळके गंभीर जखमी झाले. या प्रकरणी तुषार अशोक शेळके याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात निखिल गांगर्डे विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून घेतला होता.

अवश्य वाचा : गुडन्यूज! जूनमधील मान्सून आता जुलैमध्ये बरसणार

शोध घेऊन आरोपी गांगर्डेला अटक (Attempted Murder)

या प्रकरणातील आरोपीचा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, आरोपी निखिल गांगर्डे  हा सातारा जिल्ह्यात आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पोलीस पथक साताऱ्याला रवाना केले. त्यानुसार पथकाने शोध घेऊन साकुर्डी (ता. कराड) येथून आरोपी गांगर्डेला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here