Attempted Murder : बेलगाव येथे खुनाचा प्रयत्न करणारे दोघे आरोपी जेरबंद

Attempted Murder : बेलगाव येथे खुनाचा प्रयत्न करणारे दोघे आरोपी जेरबंद

0
Attempted Murder

Attempted Murder : नगर : शेवगाव तालुक्यातील बेलगाव येथील शेतातील रस्त्याच्या कारणावरून खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. महादेव अंकुश गायके (वय २०) व गणेश जालिंदर गायके (वय १९, दोन्ही रा. बेलगाव, ता. शेवगाव) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.

नक्की वाचा: श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड

कुऱ्हाड, लाकडी दांडके, काठ्या व कोयत्याने जीवघेणा हल्ला

बेलगाव येथे गोपीचंद पोपळे व त्यांचे कुटुंबिय शेतात वाहन येण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करत होते. त्यावेळी रामदास गायके व पाच जणांनी रस्त्यात खड्डे का करता, आमच्या शेतात पाणी सोडल्याने शेताचे नुकसान होत आहे, असे म्हणत त्यांनी पोपळे कुटुंबावर कुऱ्हाड, लाकडी दांडके, काठ्या व कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गोपीचंद पोपळे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला.

Attempted Murder

अवश्य वाचा: मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

जेरबंद आरोपी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात (Attempted Murder)

या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, पसार आरोपी महादेव गायके व गणेश गायके हे पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना परिसरात आहेत. त्यानुसार पथकाने शिताफीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने पुढील जेरबंद आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here