Aurangzeb : औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी राहाता येथे घोषणाबाजी

Aurangzeb : औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी राहाता येथे घोषणाबाजी

0
Aurangzeb : औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी राहाता येथे घोषणाबाजी
Aurangzeb : औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी राहाता येथे घोषणाबाजी

Aurangzeb : राहाता : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील औरंगजेबाची (Aurangzeb) कबर हटविण्याच्या मागणीसाठी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर

या निवेदनात म्हंटले आहे की,

औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केली. देशातील अनेक मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर बळजबरीने धर्मांतर केले. अशा क्रूरकर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही गुलामीचे व यातनेचे प्रतीक आहे. तरी ही कबर पूर्णपणे कुठलेही नामोनिशाण न ठेवता योग्य पद्धतीने काढून टाकावी, अशी मागणी निवेदनाद्वारे बजरंग दल व विहिंप यांनी केली आहे. ही कबर काढून न घेतल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कुच करतील व ही कबर काढून टाकतील, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.

अवश्य वाचा : ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित;२१ मार्चला चित्रपट होणार प्रदर्शित   

कबरीच्या फोटोवर हातोडा मारून केला निषेध (Aurangzeb)

यावेळी औरंगजेब व कबरीच्या प्रतिमा फाडत उपस्थित कार्यकर्त्यांनी कबरीच्या फोटोवर हातोडा मारून निषेध केला.या निवेदनावर विहिंपचे जिल्हा संयोजक योगेश मखाना, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, तालुका संयोजक ईश्वर टिळेकर, दिनेश टाकेचा, मयूर चोळके, साई पानसरे, ज्ञानेश्वर पाडेकर, अनिकेत सोमवंशी, अविनाश दुबसे, दीपक भोसले, मंगेश सोनवणे, आकाश बावके, सागर पानसरे, विवेक जाधव, संदीप शेलकर, दिलीप दिनेश सांबारे, वैभव अनुप, तेजस ढोमसे, रोहित तुटके व ओंकार थोरात आदींच्या सह्या आहेत.