नगर : नव्या वर्षात रिलीज होणाऱ्या अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhaava Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृगात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अशातच आता निर्मात्यांनी चित्रपटातील इतर स्टार्सचे लूक जारी करण्यात सुरुवात केली आहे. आता या चित्रपटातील औरंगजेबाचा लूक जरी करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’मधील लूक आला समोर;दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
लांब दाढी, पांढरे केस आणि चेहऱ्यावर सुरकुत्या असा धडकी भरवणारा चित्रपटातील औरंगजेबाचा लूक निर्मात्यांनी जारी केला आहे. पण,हा अभिनेता कोण आहे? हे ओळखणंही कठीण झालं आहे. औरंगजेबाचा लूक पाहून सर्वांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.हा अभिनेता दुसरा कोणी नसून ‘छावा’ मध्ये औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहे. त्याला या लूकमध्ये ओळखणंही कठीण होऊन बसलं आहे.
अक्षय खन्नाचा लूक पाहून चाहते हैराण (Akshay Khanna in Chhaava)
पांढरे केस, डोळ्यांत काजळ, पांढरी लांबलचक दाढी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या. मोघलांच्या इतिहासातील सर्वात क्रूर शासक अशी ओळख असणाऱ्या औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाला ओळखणंही कठीण होऊन बसलं आहे. अक्षयचे डोळे चक्क सूडाची आग ओकत असल्याचं दिसत आहे. या गेटअपमध्ये अक्षय खन्ना खूपच भारी दिसतोय. लूक पाहून कोणीही अक्षय खन्नाला ओळखू शकत नाही. अक्षय खन्नाच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अवश्य वाचा : जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज
मॅडॉक फिल्म्सनं मंगळवारी (ता.२१) अक्षय खन्नाचा हा लूक शेअर केला.या पोस्टरमध्ये,औरंगजेबची भूमिका करणारा अक्षय डोळ्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर काढत दिसत आहे आणि तो रागानं त्याच्या शत्रूंकडे पाहत आहे. त्याचे लांबलचक पांढऱ्या केसांनी त्याचा चेहरा झाकला आहे, तरी त्यातून त्याची तीक्ष्ण नजर दिसतेय, जी शत्रूंना यमसदनी धाडण्यासाठी आतूर झाली आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं आहे की, ‘भीती आणि दहशतीचा नवा चेहरा. मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना.’
लक्ष्मण उतेकर यांनी केलं ‘छावा’चे दिग्दर्शन (Akshay Khanna in Chhaava)
‘छावा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे आणि निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे.