Paralympic 2024:भारताच्या अवनी लेखराने रचला इतिहास!पॅरिसमध्ये मिळवले पहिले गोल्ड,कांस्यही भारताच्या खात्यात  

0
Paralympic 2024:भारताच्या अवनी लेखराने रचला इतिहास!पॅरिसमध्ये मिळवले पहिले गोल्ड,कांस्यही भारताच्या खात्यात  
Paralympic 2024:भारताच्या अवनी लेखराने रचला इतिहास!पॅरिसमध्ये मिळवले पहिले गोल्ड,कांस्यही भारताच्या खात्यात  

paralympic 2024 : पॅरिसमध्ये सध्या पॅरालिम्पिक स्पर्धा (Paris paralympic) सुरु असून या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. मात्र दुसऱ्या दिवशी भारताने या स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) अचूक नेमबाजी करत भारताला सुर्वणपदक (Gold Medal) मिळवून दिले आहे.  

नक्की वाचा : ‘मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो’- नरेंद्र मोदी

अवनीने मिळवले गोल्ड तर मोना अग्रवालला कांस्य (Paralympic 2024)

नेमबाज अवनी लेखराने टोक्यो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलं होतं. आता पुन्हा तशीच कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच १ स्पर्धेत तिने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने २४९.७ गुणांची कमाई केली आणि सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. तसेच या स्पर्धेत कांस्य पदकही भारताच्या नावावर राहिलं. मोना अग्रवालने २२८.  गुण मिळवत कांस्य पदकावर नाव कोरलं.आहे. त्यामुळे या स्पर्धेत सुवर्ण आणि कास्य पदक भारताला मिळालं आहे. तर रौप्य पदक दक्षिण कोरियाच्या युनरी लीच्या नावावर राहिलं आहे.

अवश्य वाचा : अभिनेते मकरंद अनासपूरे,सिद्धार्थ जाधव खेळणार ‘एक डाव भुताचा’,चित्रपटाचे पोस्टर होणार प्रदर्शित

अवनीने मिळविले सलग दुसऱ्यांदा सुवर्ण! (Paralympic 2024)

अंतिम फेरीतील शेवटची संधी असताना अवनी दुसऱ्या स्थानावर होती. अवनी कोरियन युनरी लीपेक्षा ०.८ गुणांनी मागे होती. अंतिम फेरीत फक्त एक शॉट बाकी होता. पण कोरियनने ६.८ असा शॉट मारला आणि गणित चुकलं. तर या संधीचं सोनं अवनीने केलं. अवनीने पॅरिसमधील शूटिंग रेंजवर १०.५ चा अचूक वेध घेतला आणि अव्वल स्थान पटकावलं. अवनीने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सलग दुसऱ्यांदा सुवर्ण मिळवण्याची कामगिरी अवनी लेखराने केली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी अवनी भारतीची पहिली महिला एथलीट आहे. अवनीने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये कांस्य पदकही जिंकलं होतं. तिच्या या कामगिरीने सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here