Avatar Meher Baba : नगर : येथील अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील मेहराबाद (Meherabad) (अरणगाव)मधील मेहेरबाबाच्या (Avatar Meher Baba) टेकडीवरील समाधी स्थळी ५६ वी अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा आजपासून प्रारंभ झाला. त्या निमित्त मोठ्या संख्न्येने कालपासून भाविक येण्यास सुरवात झाली. आज पहाटे पासूनचं समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत सुमारे लाखभरापेक्षा जास्त मेहेरप्रेमी भारतातून (India) आले आहेत. १ फेब्रुवारी २५ पर्यंत हा सोहळा होणार आहे.
नक्की वाचा : “मी काही साधू संत नाही”; बीडमधून अजित पवार यांचा इशारा
दर्शनासाठी विशेष व्यवस्था
दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते. त्यामुळे गडबड, गोंधळ होण्याचा संभव नसतो. एका वेळेस पाचशे लोकांना टोकन दिले जाते. त्याचा नंबर प्रमाणे दर्शनास सोडले जाते. त्याची ही वेळ आधी सांगितली जाते. त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात. त्याच्यासाठी दर्शन रांग व त्यावरील मंडप, पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश
मेहराबाद टेकडी मेहेरप्रेमी जणांनी फुलून गेली (Avatar Meher Baba)
अहिल्यानगर शहरापासून ६ किलोमीटर असलेल्या मेहराबाद येथील टेकडी मेहेरप्रेमी जणांनी फुलून गेली आहे. अवतार मेहेरबाबा की जयचा जयघोष ते करत आहे. सकाळी १० वाजता बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून विविध भाषेतून आरती प्रार्थना म्हणून अमरतिथीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमासाठी ४० हजार भाविक बसतील एवढा मोठा मंडप आहे. मेहेरप्रेमी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर करतील त्याच बरोबर बाबावरील फिल्म ही दाखवण्यात येतील.संपूर्णतीन दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणर आहे. एस. टी.ने येणाऱ्या भाविकांसाठी तीनही बसस्थानकांवरून मेहेराबादला बस सोडण्यात येत आहेत. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे. अग्निशामक दल ही आहे. अनेक उपहारगृहे, प्रसादाची दुकाने, बाबाची फोटो, किचेन आदी विविध वस्तूची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. तर हजारो युवक, युवती स्वयंसेवकाचे काम करत आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला जगात मी कोठेही देह सोडला तरी मेहेरावाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधीस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते. ३१ जानेवारी १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणून या ठिकाणी अमरतिथी सोहळयासाठी लाखो भाविक येत असतात.
मेहेरबाबांचा जन्म पुणे येथे २५फेब्रुवारी१८९४ रोजी झाला.कॉलेजनंतर ते अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले. शिर्डीचे साईबाबा,शिर्डी जवळील साकुरीचे उपासनी महाराज,पुण्याचे हजरत बाबाजान,नागपूरचे ताजुद्दीन बाबा,दौंड जवळील केडगांव बेटचे नारायण महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. सर्व जातीधर्मातील लोकांना मानवतेचा संदेश देत पुढे त्यांनी जगभर प्रवास केला.
१९२३ साली बाबा अहिल्यानगरला प्रथम आले होते. त्यांच्या अरणगाव (मेहेराबाद) येथील कुटीवर सर्व धर्माचे प्रतीक म्हणून सात रंगाचा ध्वज लावण्यात आला. याच ठिकाणी त्यांनी १९२५ला धर्मार्थ दवाखाना व मोफत शाळा सुरु केली. बाबांनी१० जुलै १९२५ ते शेवटपर्यंत म्हणजे ३१ जानेवारी १९६९, असे ४४ वर्षे मौनव्रत पाळले. या काळात ते कोणाशीच बोलले नाही. यातच त्यांनी भारतात अनेक ठिकाणी व१३ वेळा अध्यात्म प्रचारासाठी जगप्रवास केला.
त्यांनी गॉडस स्पिक, लिसन ह्युमिनिटी, परफेक्ट मास्तर, अवतार आदी ग्रंथ लिहिले. जगात कोठेही माझे निधन झाले तरी माझी समाधी अरणगाव (मेहेराबाद) येथेच बांधावी असे बाबांनी आपल्या भक्तांना सांगुन ठेवले होते. हेच ठिकाण आता मेहेराबाद म्हणुन प्रसिद्ध आहे. शेवटचा काळ त्यांनी पिंपळगाव माळवी (मेहेराझाद) येथे घालविला. तेथेच त्यांचे३१ जानेवारी१९६९ रोजी महानिर्वाण झाले. नंतर त्यांची समाधी मेहेराबाद येथे बांधण्यात आली.
नगरमधील किंग्जरोडवर अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अवतार मेहेरबाबा केंद्र आहे. या ठिकाणाहुन सर्व कारभार पाहिला जातो. परदेशात ही बाबांचे अनेक आश्रम आहेत. अमेरिका,ऑस्ट्रेलिया,ग्रेट ब्रिटन,इराण आदी ३० देशात ४०० केंद्र असुन भारतात अडीच हजार केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रात दरवर्षी विविध उत्सव साजरे केले जातात. यामध्ये १० जुलै रोजी मौन सोहळा २४ तास पाळला जातो. १० जुलै १९२५ रोजी मेहेरबाबांनी मौनास प्रारंभ केला म्हणुन हा उत्सव केला जातो. १६ ऑक्टो.हा नविन जीवन सोहळा म्हणुन साजरा केला जातो. १६ ऑक्टो. १९४९ रोजी नविन जीवन म्हणुन बाबांनी दोन वर्षे पायी प्रवास केला. म्हणुन बाबाप्रेमी नगर ते मेहेराबाद पायी दिंडी काढतात. ३१ जाने. हा बाबांचा अमरतीथी सोहळा फक्त मेहेराबाद येथेच साजरा केला जातो. ३१ जाने.१९६९ या दिवशी बाबांचे महानिर्वाण झाले. म्हणुन हा दिवस साजरा केला जातो.
Table of Contents
२५ फेब्रु. हा बाबांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात प्रत्येक केंद्रात साजरा केला जातो. राम,कृष्ण,बुद्ध,येशुख्रिस्त,महंमद पैगंबर,त्यानंतर मेहेरबाबांचा अवतार आहे असे त्यांचे भक्तगण समजतात. त्यांच्या प्रत्येक भक्तगण सर्व धर्माचे चिन्ह शुभ म्हणुन वापरतात. ट्रस्टच्या बोधचिन्हावर ही सर्व धर्माची ही चिन्हे आहेत
सर्व धर्मिय,परदेशात,देशात प्रसिद्ध असलेल्या अवतार मेहेरबाबाची मेहेराबाद व मेहेराझाद या ठिकाण नगर शहराजवळ असून त्याठिकाणी एकदा तरी प्रत्येकाने पाहण्यासाठी व दर्शनासाठी गेले पाहिजे