Avinash Ghule : ऑटो रिक्षा फिटनेस दंडास शासनाची स्थगिती – अविनाश घुले

Avinash Ghule : ऑटो रिक्षा फिटनेस दंडास शासनाची स्थगिती - अविनाश घुले

0
Avinash Ghule : ऑटो रिक्षा फिटनेस दंडास शासनाची स्थगिती - अविनाश घुले
Avinash Ghule : ऑटो रिक्षा फिटनेस दंडास शासनाची स्थगिती - अविनाश घुले

Avinash Ghule : नगर : ऑटो रिक्षा (Auto Rickshaw) फिटनेस दंड शासनाने (Government) स्थगित केला या निर्णयाचे स्वागत जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा येथे स्वागत करुन फाटाके फोडण्यात आले.

नक्की वाचा: आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश घुले (Avinash Ghule), वैभव जगताप, विलास कराळे, दत्ता वामन, बबनराव बारस्कर, समीर कुरेशी, भैय्या पठाण, अशोक चोभे, अशोक औशिकर, लतिफ शेख, बाबा दस्तगीर, बापू दारकुंडे, विष्णू आंबेकर, रवीकिरण वाघ, नासिर खान, किशोर कुलट, अन्वर शेख, सुधाकर साळवे, फैरोज शेख, विजय शेलार, अभय पतंगे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा: विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा

अविनाश घुले म्हणाले, (Avinash Ghule)

ऑटो रिक्षाच्या फिटनेस प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यासाठी शासनाने मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत अनेक रिक्षा चालकांना अडचणीमुळे तो भरता आला नाही. त्यामुळे शासनाने नुतनीकरण न केलेल्या ऑटो रिक्षास प्रत्येक दिवसाला ५० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश काढण्यात आला होता. या विरोधात संघटनेने सर्वस्तरावर निवेदने, आंदोलने केली. मात्र, प्रश्‍न प्रलंबित होता. याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर त्यांनी या प्रश्‍नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून मुंबई येथे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व संघटनेचे राज्य पदाधिकारी यांच्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा हा प्रश्‍न नगर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील रिक्षा चालकांचा आहे. त्याचबरोबर या दंड आकारणीतही दुजाभाव केला जात होता. मोठ्या वाहनांनाही तितकाच दंड आणि हातावर पोट असणार्‍यांना तितकाच. या अन्याय विरोधात तीव्र आंदोलन केल्यानंतर शासनाने दखल घेत आता हा दंड स्थगित केला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, ही दंड वसुली स्थगित झाल्याने ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्यासह संघटनेने आमदार जगताप व शासनाचे आभार मानून जल्लोष केला असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते बाबा आढाव, पुणे येथील रिक्षा संघटनेचे सचिव नितीन पवार आदींनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here