Award : नगर : दरवर्षी कॉम्रेड भास्करराव जाधव (Comrade Bhaskarrao Jadhav) यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा राज्यव्यापी अभिवादन पुरस्कार (Award) यावर्षी मराठवाड्याच्या ज्येष्ठ पत्रकार (Senior journalist) व सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवसरा व महाराष्ट्रातील कष्टकरी चळवळीचे बिनीचे कार्यकर्ते कॉम्रेड शांताराम पंदेरे या दाम्पत्यास जाहीर करण्यात आल्याची माहिती कॉम्रेड भास्कर जाधव स्मृती प्रतिष्ठान नगर व लाल निशान पक्ष लेनीनवादीचे राज्य सरचिटणीस यांचे वतीने जाहीर करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू
कॉम्रेड भास्करराव यांचे असंघटित कामगारांसाठी मोठे काम
कॉम्रेड भास्करराव हे कट्टर साम्यवादी पूर्णवेळ कार्यकर्ते होते तसेच ते दैनिक श्रमिक विचार पुण्याचे संपादक, कवी, लेखक लोकसाहित्यिक व विविध विषयांचे गाढे अभ्यासक होते. असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मोठे काम त्यांनी उभे केले. नगर येथील गुणे आयुर्वेद महाविद्यालयात ते ॲक्युप्रेशर व ॲक्युपकचर हे विषय शिकवीत तसेच विविध वैद्यकीय शाखांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या या पैलूंच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील पुरोगामी कामगार कष्टकरी चळवळीतील पूर्ण वेळ कार्यकर्ते, पत्रकार, लोकशाहीर कवी, लेखक प्रकाशक,लोक शाहीर यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाते. मानपत्र भेटवस्तू व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू
खिवसरा यांचे भटक्या विमुक्तांसाठी मोठे योगदान (Award)
यंदाचे पुरस्कार प्राप्त दाम्पत्य मागील ४० वर्षे ग्रामीण कामगार कष्टकरी आदिवासी यांच्या कार्यात अग्रेसर असून आयुष्यमान मंगल खिवसरा भारतीय लोक पर्यावरण विकास संस्था औरंगाबाद यांच्या अध्यक्ष असून मराठवाडा ग्रुप वृत्तपत्रात उपसंपादक आहेत. मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेल्या आहे. नामांतर मंडल आयोग चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भटक्या विमुक्त महिलांच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी लढे उभारले आहेत सुमारे ३०० आदिवासी व बाराशेच्या वर बौद्ध मातंग, चर्मकार, बंजारा, ख्रिश्चन आणि कुटुंबांना सुमारे दोन हजार एकरच्या गायरान जमिनीवर त्यांनी जमीन हक्क मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. महिला सुरक्षा समितीत त्यांचे मोठे योगदान असून विविध नियतकालिका त्यांचे लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आजवर ६० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
शांताराम पंदेरे यांनी लोकसमूहाबरोबरच्या युक्रांद चळवळीत काम केले आहे. दुष्काळ रोजगार दलित आदिवासी भटक्या विमुक्त गायरान व वन हक्क जमीन चळवळीत गेली. ५० वर्षे ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत भारिप महासंघ बहुजन महासंघ व बहुजन वंचित बहुजन आघाडी यामध्ये त्यांचा सक्रिय सहभागातून पाक्षिक प्रबुद्ध भारत मध्ये ते नियमित लेखन करीत आहेत. आजपर्यंत किमान ६० ते ७० वेळा चळवळीसाठी त्यांना तुरुंगवास भोगाव लागला आहे लाल निशान पक्षाशीही त्यांचा जुना संबंध आहे. मंगल खिवसरा व शांताराम पंदेरे हे कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्या तरुणपणापासून सहवासात होते.
मंगळवारी (ता. १८) हा पुरस्कार प्रदान समारंभ औरंगाबाद येथे पत्रकार जयदेव डोळे व ज्येष्ठ दलित साम्यवादी कार्यकर्ते अॅड. बी.एच गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अभय जाधव, करुणा जाधव, सुषमा जाधव, अमर, प्रियदर्शन बंडेलू, प्रकाशजित अमरसिंग यांनी केले आहे.