Axar Patel:अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

0
Axar Patel:अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!
Axar Patel:अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

नगर : आयपीएल (IPL 2025) सुरु होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी बाकी असताना दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) त्यांचा कॅप्टन (Captain) जाहीर केला आहे.दिल्ली कॅपिटल्सनं कॅप्टन म्हणून ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या (Axar Patel) नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी रिषभ पंतनं (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं.आता रिषभ पंत लखनौ सुपर जायंटस संघात गेल्यानं नवी दिल्लीला नवा कर्णधार शोधावा लागला. टी २० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलवर आता कॅप्टन म्हणून जबाबदारी देण्यात आली.

नक्की वाचा : सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला!  

दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल नवा कर्णधार  (Axar Patel)

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये झालेल्या रिटेन्शन प्रक्रियेत दिल्लीने १६.५ कोटी रुपये खर्चून अक्षरला रिटेन केलं होतं. यापूर्वी ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करत होता. मात्र लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघाने पंतला ताफ्यात सामील केल्याने दिल्लीची धुरा कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला होता. दिल्लीकडे फाफ डू प्लेसिस आणि के.एल.राहुल हे पर्याय होते. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन केएल राहुल होईल,अशी शक्यता होती. मात्र, केएल राहुलनं ती ऑफर नाकारली होती. यामुळं दिल्ली कॅपिटल्सनं अक्षर पटेलला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. दिल्लीने सोशल मीडियावर २ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करत जाहीर केलं की,अक्षर पटेल टीमचं नेतृत्व करेल.  

हेही पहा :पुन्हा आढळला शीर नसलेला मृतदेह; जिल्ह्यात नेमकं चाललयं तरी काय?

अक्षर पटेलचे आयपीएल मधील करिअर (Axar Patel)

अक्षर पटेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स,पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळला आहे.आयपीएलच्या १५० सामन्यांमध्ये अक्षर पटेलनं १३०.८८ च्या स्ट्राइक रेटनं आणि २१.४७ च्या सरासरीनं १६५३ धावा केल्या आहेत. अक्षर पटेलनं गोलंदाज म्हणून ७.२८ च्या इकोनॉमीनं २५.२ च्या स्ट्राइक रेटनं १२३ विकेट घेतल्या आहेत. २१ धावात ४ विकेट ही अक्षर पटेलची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

भारतीय क्रिकेट संघात देखील अक्षर पटेलनं चांगली कामगिरी केली आहे. भारतानं वेस्ट इंडिजमध्ये मागील वर्षी जून महिन्यात टी २० वर्ल्ड कप जिंकला होता.त्यामध्ये अक्षर पटेलची ऑलराऊंडर म्हणून कामगिरी महत्त्वाची ठरली होती. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील अक्षर पटेलनं महत्त्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून दिल्या. भारताच्या फलंदाजीमध्ये अक्षर पटेलला पाचव्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय देखील संघ व्यवस्थापनाने घेत त्याच्यावर विश्वास दाखवला.आता अक्षर पटेल दिल्लीला आयपीएलच्या विजेतेपदापर्यंत घेऊन जाण्यात यश मिळवतो का ते पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here