Ayodhya : नगर : सोलापूरमधून आस्था विशेष रेल्वे भक्तांना अयोध्येला (Ayodhya) राम मंदिरात (Ram Mandir) दर्शन घडविण्यासाठी निघाली आहे. यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या हिंदुत्ववादी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रातील १ हजार ४४० कार्यक्रर्ते समाविष्ट झाले आहेत. आज सकाळी ९ वाजता नगर शहरातून ही यात्रा अयोध्येच्या दिशेने निघाली. राम भक्तांची निवास व्यवस्था कारसेवापूरम येथे असेल. शुक्रवारी (ता. १६) सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा
आस्था विशेष रेल्वेने रवाना (Ayodhya)
नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अयोध्या धाम यात्रेला श्रीराम मंदिर दर्शनासाठी आस्था विशेष रेल्वेने आज सकाळी ९ वाजता रवाना झाले. यात्रेकरूंचे नगर रेल्वे स्थानक येथे नगरकरांनी मोठ्या उत्साहात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगीविश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण, विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री तथा यात्रा प्रमुख मुकुल गंधे, प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, मठ मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे, दत्ता जगताप, भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री निलेश चिपाडे, सोमनाथ जाधव, केशव भुजबळ, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, प्रशांत मुथा, दत्ता गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, सचिन पारखी आदी उपस्थित होते. या यात्रेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुद्राळे, महेश कर्पे, निखिल कुलकर्णी, नितीन वाटकर व संकेत राव यांनी केले आहे.
नक्की वाचा: मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक
नगर शहरात मोठ्या उत्साहाने यात्रेकरूंचे स्वागत (Ayodhya)
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण यांनी सांगितले की, साडेपाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण झाले आहे. राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. नगर जिल्ह्याची ही पहिलीच यात्रा असून नगर शहरात मोठ्या उत्साहाने यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर व दर्शन होत असल्याने रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.