Ayodhya Ram Mandir : नगर : नवीन वर्षात अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिराची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी प्रभू श्रीरामांच्या अभिषेकासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी साधूसंतांना निमंत्रण पत्र पाठवण्यात आली आहेत. आता या कार्यक्रमासाठी प्रभू श्रीरामांचे कपडे थेट सीमा पार म्हणजेच पाकिस्तानमधून (Pakistan)अयोध्येत पोहोचले आहेत.
नक्की वाचा : महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्ला आणि इतर देवतांच्या अभिषेक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून श्रीरामांचा पोशाख अयोध्येत पोहोचला आहे. पाकिस्तानातील सिंधी लोकांनी हा रामलल्लासाठी हा खास पोशाख पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून पाठवला आहे. हा पोशाष श्रीरामांना परिधान केला जाईल.
हेही वाचा : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ची पहिल्या दिवशी कोटींची कमाई
रामनगरच्या देवालय मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या या आलेल्या पोशाखाची पूजा करण्यात आली. हिंदू रितीरिवाजानुसार कापड शुद्ध करण्यासाठी २१ पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांसह आरती केली. रविवारी (ता.३) पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधी समाजाचे लोक रामलल्लाचा पोशाख राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करणार आहेत. यासाठी सिंध प्रांतातून शेकडो लोक अयोध्येत दाखल झाले आहेत. या अभिषेक सोहळ्यासाठी सर्वात आधी संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात देशभरातून सुमारे चार हजार संत जमणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम ऋषी-मुनींना आमंत्रणे पाठवली गेली. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी हे निमंत्रण पत्र पाठवले आहे.