नगर : अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. कारण दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं (Jaish -E-Mohammad) हे राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर या धमकी प्रकरणाचा एक ऑडिओही व्हायरल (Viral Audio) होत आहे. यामध्ये राम मंदिर बॉम्बनं उडवणार असल्याचं बोललं जात आहे. हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलीस आणि एटीएससह केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
नक्की वाचा : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी
धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल (Ram Mandir Blast Threat)
शुक्रवारी (ता.१४) सोशल मीडियावर एक ऑडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रामजन्मभूमीवर बोलत आहे. ऑडिओमध्ये जैशचा दहशतवादी म्हणत आहे की, “आमची मशीद हटवून मंदिर बांधले आहे, आता बॉम्बस्फोट होणार आहेत. आमच्या तीन साथीदारांचे बलिदान झाले असून, आता हे मंदिर पाडावे लागेल.” हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्यात.
अवश्य वाचा : इटलीच्या संसदेत राडा;खासदारांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी
अयोध्येत सुरक्षा वाढवली (Ram Mandir Blast Threat)
राम मंदिर उडवून देण्याच्या धमकीनंतर मंदिर आणि इतर महत्त्वाच्या आस्थापना आणि संस्थांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अयोध्येचे एसएसपी राजकरन नय्यर यांनी स्वतः मंदिर आणि अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. परिसरात सुरक्षा दलांची गस्त आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एसएसपी नय्यर यांनी दहशतवादी संघटनेच्या धोक्याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र अयोध्येतील राम मंदिराची सुरक्षा आधीच कडेकोट असून त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते असं म्हटलं आहे. त्याच अनुषंगाने आजही मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अयोध्या धामच्या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत संपूर्ण शहराची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक विभागाची जबाबदारी वरिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
राम मंदिर संकुलात सर्व ठिकाणी सुरक्षा दलांचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसां व्यतिरिक्त पीएसी दलांचाही सहभाग आहे. याशिवाय शहरातील इतर सर्व महत्त्वाच्या आस्थापना आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने रिअल टाईम इनपुट जनरेट होत असून त्या आधारे आवश्यक व्यवस्था व तयारी केली जात आहे.या धमकीनंतर संपूर्ण अयोध्या शहरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. अयोध्या शहराची आणि मंदिराची सुरक्षा अभेद्य आहे. तरीही कोणत्याही दहशतवादी संघटनेचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराची सुरक्षा अधिक कडक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.