Ayushman Card:अहिल्यानगर जिल्ह्यात २० लाख नागरिकांना पाच लाखांचे आरोग्यकवच 

0
Ayushman Card:अहिल्यानगर जिल्ह्यात २० लाख नागरिकांना पाच लाखांचे आरोग्यकवच 
Ayushman Card:अहिल्यानगर जिल्ह्यात २० लाख नागरिकांना पाच लाखांचे आरोग्यकवच 

Ayushman Card : आपल्या घरात कुणीतरी गंभीर आजाराने त्रस्त आहे. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण केंद्रसरकारने तुमच्यासाठी आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme)आणलेली आहे. गंभीर आजारांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च परवडत नसल्याने केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २० लाख कुटुंबांना आयुष्मान कार्डच (Ayushman Card) वाटप करण्यात आलय. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा (Free treatment up to Rs. 5 lakh) मिळणार आहे. आयुष्मान कार्ड वितरण प्रक्रिया बारा अंकी रेशन कार्ड नंबर असलेल्यांना स्वतःच्या पातळीवरही पूर्ण करून घेता येते. वेगवगेळ्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च बऱ्याच कुटुंबांना परवडत नाही.

नक्की वाचा : गोळी लागली तरीही तो थांबला नाही,आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी!  

आयुष्मान कार्ड देण्यासाठी डिजिटल प्रक्रिया (Ayushman Card)

शहरातील खासगी दवाखान्यात केस पेपरलाच कमीत कमी ५०० तर विविध तपासण्यांसाठी दहा हजार रुपये लागतात. गरज पडल्यास शस्त्रक्रिया, औषधांचा खर्च देखील प्रचंड असतो. यासाठी गरीब, मध्यवर्गीय संबंधित कुटुंबाला घर, शेत, दागिने विकून दवाखान्याचा खर्च भागवावा लागतो. अपघाती रुग्णांवर उपचार करण्यासाठी तर अनेक खासगी रुग्णालयांत पहिल्यांदा अॅडव्हान्स द्यावा लागतो. त्यानंतरच दवाखान्यात उपचाराला सुरुवात करतात. म्हणून शासनाने आयुष्मान योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत खासगी आणि सरकारी दवाखान्यात मोफत उपचाराची ही योजना आणली आहे. आयुष्मान कार्ड देण्यासाठी सध्या डिजिटल प्रक्रिया सुरू आहे.

अवश्य वाचा: अजित दादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवा;रोहित पवारांची मागणी  

पाच लाखांपर्यंत मोफत उपचार (Ayushman Card)

रेशन दुकानात आणि पुरवठा प्रशासनाकडे शासकीय शुल्कात ही सेवा देणे बंधनकारक करण्यात आलं आहे. आयुष्मान कार्डच्या योजनेतून गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जात जातात. सध्या या कार्डसंबंधी जनजागृती केली जात आहे. ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे. अश्या रेशरकार्डधारकांच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती घेऊन कार्ड वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत २० लाख आयुष्मान कार्ड तयार झाले आहेत. मात्र येणाऱ्या काळात ४१ लाख ६५ हजार नागरिकांना आयुष्मान कार्ड देण्यात येणार आहे.  जर तुम्ही आयुष्मान कार्ड अजून काढलेले नसेल तर लगेच काढून घ्या, कारण वेळ कोणावर कधी आणि कशी येईल हे कुणीच सांगू शकत नाही.