Ayushman Card:आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर… 

0
Ayushman Card:आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर... 
Ayushman Card:आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर... 

Ayushman Card : आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य जपणे अधिक महत्वाचे होत आहे. मात्र बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. त्यात आर्थिक स्थिती कमकुवत असले तर अशा कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन, सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (Prime Minister’s Public Health Scheme) देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत आयुष्मान कार्डद्वारे (Ayushman Card) मोफत उपचार देत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. आता आयुष्मान कार्डमध्ये कोणत्या आजारांचा समावेश याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

नक्की वाचा : अभिमानास्पद!भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले

योजनेचा लाभ कोणाला मिळेल ? (Ayushman Card)

सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांचा समावेश आहे. उत्पन्न कमी किंवा जास्त असलेले लोकं देखील या योजनेसाठी पात्र आहेत. ज्यांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकत नाही, असेही लोक या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, PF किंवा ESIC ची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

अवश्य वाचा : रायगड किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय  

योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे कसे तपासाल ?  (Ayushman Card)

तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी, त्याच्या अधिकृत पोर्टल http://beneficiary.nha.gov.in/ वर जा.

आता ‘मी पात्र आहे का’ या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि त्यावर मिळालेला OTP पडताळून पहा.

यानंतर, तुमचे नाव, राज्य, जिल्हा इत्यादी माहिती भरा.

जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.

आयुष्मान कार्डमध्ये कोणत्या आजारांचा समावेश?  (Ayushman Card)

हृदयरोग

कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD), हृदयविकाराचा झटका, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, उच्च रक्तदाबाशी संबंधित आजार, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग, स्तन, गर्भाशय ग्रीवा, तोंड, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी कव्हर केली जाते.

न्यूरोलॉजिकल रोग

स्ट्रोक आणि अर्धांगवायू, ब्रेन ट्यूमर, एपिलेप्सी उपचार, स्पाइनल कॉर्ड रोग आणि पार्किन्सन यांचा समावेश आहे.

मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे आजार

क्रॉनिक किडनी डिसीज (CKD), मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसिस आणि मूत्रमार्गाचा संसर्ग यांचा समावेश आहे.

यकृत आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग

यकृत सिरोसिस, हेपेटायटीस बी आणि सी, पित्ताशयातील खडे, अ‍ॅपेंडिसाइटिस शस्त्रक्रिया आणि हर्निया उपचार दिले जातात.

श्वसन रोग

दमा व्यवस्थापन, सीओपीडी, टीबी, न्यूमोनिया आणि इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार (आयएलडी) यांचा समावेश आहे.

ऑर्थोपेडिक

हिप आणि गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर आणि हाडांच्या दुखापती, ऑस्टियोपोरोसिस उपचार आणि संधिवात यांचा समावेश आहे.

प्रसूती आणि स्त्रीरोग

सामान्य आणि सिझेरियन प्रसूती, हिस्टेरेक्टॉमी यांचा समावेश आहे.

                  आयुष्मान कार्ड या योजने अंतर्गत जळलेल्या जखमा, नवजात शिशुंची काळजी, मानसिक आजार आणि इतर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यासोबतच, जन्मजात विकार, माता आणि बालरोग काळजी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या जटिल प्रक्रिया देखील या कव्हरचा भाग आहेत. या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचा समावेश आहे, ज्यामध्ये निदान, औषधे आणि निवास व्यवस्था यांचा समावेश आहे.