Aho Vikramaarka Movie:बाहुबलीच्या कालकेयची मराठीत एन्ट्री,अभिनेते प्रभाकर मराठीत झळकणार 

0
Aho Vikramaarka Movie
Aho Vikramaarka Movie

Aho Vikramarka Movie : ‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये (Bahubali The Begining)अभिनेता प्रभास, राणा दुग्गबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना यांच्यासोबत खलनायक कालकेयची भूमिका चांगलीच गाजली होती. धडकी भरवणाऱ्या कालकेयची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर (Actor Prabhakar) यांनी साकारली होती. त्यांनी साकारलेल्या ‘कालकेय’ च्या भूमिकेमुळे त्यांना नवी ओळख मिळाली. आता ‘कालकेय’ म्हणजे अभिनेता प्रभाकर मराठीत दिसणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात झळकणार आहेत.

नक्की वाचा : धक्कादायक! बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार  

‘अहो विक्रमार्का’ ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार (Aho Vikramaarka Movie)

देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला  प्रदर्शित होणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ या अॅक्शनपटात अभिनेता प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका तो साकारताना पहायला मिळणार आहे.  ‘अहो विक्रमार्का’ पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ३० ऑगस्टला ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘बेगाडा’ चित्रपटात रंग भरणार (Aho Vikramaarka Movie)

दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात इमोशन्स, सूडनाट्य आणि ड्रामा असलेला ‘अहो विक्रमार्का’ जबरदस्त अॅक्शनपट  असणार आहे. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांना पहायला आवडतो. बलदंड  शरीरयष्टी, भारदस्त आवाजाच्या जोरावर भेदक नजर आणि डायलॉग बोलण्याची अनोखी अदा या जोरावर ‘बेगाडा’ हा खलनायक चित्रपटात जबरदस्त रंग भरणार आहे.

अवश्य वाचा : जखणगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसाद वर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे.‘अहो विक्रमार्का’ हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here