Babasaheb Tarte : नगर : गेल्या चाळीस वर्षांपासून विखे कुटुंबाने (Vikhe Family) पारनेर तालुक्यातील जनतेला पाण्याच्या प्रश्नावर झुलवत ठेवले. विकासाऐवजी तालुक्यात गट तटाचे राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेतली, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) (NCP Sharadchandra Pawar) तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे (Babasaheb Tarte) यांनी केले.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
माध्यमांशी बोलताना घेतला समाचार
पालकमंत्री विखे यांनी निघोज (पारनेर) येथील कार्यक्रमात बोलताना, खासदार निलेश लंके दडपशाहीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. तालुक्यातील माफिया राज रोखण्यासाठी महायुतीला पाठबळ देण्याचे आवाहन विखे यांनी केले होते. विखे यांनी केलेल्या आरोपांचा तरटे यांनी माध्यमांशी बोलताना समाचार घेतला.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
तरटे म्हणाले की, (Babasaheb Tarte)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे या पिता पुत्रांना लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नाही. तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांनी कुकडी प्रकल्पातील पाण्याचे अमिष दाखवत पारनेर तालुक्यातील जनतेच्या जीवावर चाळीस वर्षे सत्ता उपभोगली, विकासाच्या भूलथापा दिल्या. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनीही विकास कामांना प्राधान्य देण्याऐवजी गावागावात भांडणे लावण्याचे काम केले. त्याऐवजी केंद्रातील सत्तेचा वापर करून एखादे भरीव काम केले असते तर तालुक्यातील जनता त्यांची ऋणी राहिली असती. पारनेर तालुक्यातीलच नव्हे तर दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने विखे पिता – पुत्रांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या विखे पिता पुत्रांना जळी स्थळी खासदार लंके दिसत आहेत. विखेंच्या साम्राज्याला सुरूंग लागल्याने निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेतून पालकमंत्री विखे यांच्याकडून खासदार लंके यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे तरटे म्हणाले.



