Babasaheb Wakale : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) प्रभाग सातमध्ये आम्ही विकासाचा अनुशेष भरून काढलेला आहे. रस्ते, वीज, पाणी व ड्रेनेजची समस्या संपविला आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिक नक्कीच पुन्हा संधी देणार असल्याचा विश्वास भाजपचे (BJP) माजी महापौर बाबासाहेब वाकळे (Babasaheb Wakale) यांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
विकासाच्या जोरावर तीनही उमेदवार निवडून येतील
आपल्या महापौर पदाच्या काळात व नंतरही त्यांनी प्रभागात रस्त्यांचे काँक्रेटीकरण, ओपन स्पेस मध्ये मुलांसाठी खेळणी, ओपन जिम, उद्याने, सभा मंडप अशी अनेक विकास कामे केली आहेत. तसेच मनपा मार्फत अद्ययावत आरोग्य सुविधा, मुबलक पाणी पुरवठा अशी विविध विकासकामे केली आहेत. त्यामुळे प्रभागातील विकास कामाच्या जोरावर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा: सिस्पे घोटाळ्याची चौकशीची घोषणा झाली तर एवढे गडबडता का? विखेंचा लंकेंवर निशाणा
प्रभागात प्रचार करतांना त्यांनी म्हटले आहे, (Babasaheb Wakale)
की प्रभाग सातमध्ये पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने आमच्या विजयाची सुरुवात आधीच झाली आहे. राहिलेले तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बाबासाहेब वाकळे यांच्यासोबत, वंदना ताठे, वर्षा सानप हे उमेदवारही जोरदार प्रचार करत असून त्यांना त्याच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.



