Baby Killed By Parents:बाळाचे जीवन संपवून आई-वडिलांनी घेतले देवदर्शन;नेमकं प्रकरण काय ?

0
Baby Killed By Parents: बाळाचे जीवन संपवून आई-वडिलांनी घेतले देवदर्शन;नेमकं प्रकरण काय ?
Baby Killed By Parents: बाळाचे जीवन संपवून आई-वडिलांनी घेतले देवदर्शन;नेमकं प्रकरण काय ?

Baby Killed By Parents: पोटच्या मुलाचा स्वतःच्याच हाताने कोणी गळा दाबत का? हो मात्र असं घडलंय. मुलगा व वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगावमध्ये (Ghargaon) घडली आहे. तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा आई-वडिलांनीच निर्घृणपणे खून (Three-month-old baby murdered by parents) करत त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला आहे. बुधवारी २ डिसेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. आता या प्रकरणात नेमकं काय घडलं हे आपण आज जाणून घेऊयात…

नक्की वाचा: फडणवीस साहेब लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुख यांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो

नेमकं काय घडलं ? (Baby Killed By Parents)

डॉक्टरांनी मुलाच्या आजारावर मोठा खर्च सांगितला होता. त्यामुळे आपण मुलाचे जीवन संपविले, अशी कबुली मृत मुलाच्या आई- वडिलांनी दिली आहे. विशेष म्हणजे बाळाचा खून केल्यानंतर हे दाम्पत्य वाहनाच्या चालकासह देवदर्शनाला गेले. प्रकाश जाधव (वय ३७) व सविता प्रकाश जाधव (वय ३२), असे तीन महिन्यांच्या मुलाचा खून केलेल्या आई वडिलांच नाव आहे. ते मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील आहेत. त्यांचा मोठा मुलगा हा १७ वर्षांचा आहे. तर दुसऱ्या मुलाचे नाव त्यांनी शिवांश ऊर्फ देवांश असे ठेवले होते.

शिवांश सारखा आजारी पडत असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखविण्याचे या दोघांनी ठरविले. मृत मुलाचे वडील प्रकाश जाधवने त्याचा मित्र हरिदास याला बोलावून घेतले. त्याच्याकडे चारचाकी होती. मित्राच्या चारचाकीतून मुलाला घेऊन ते बुधवारी संभाजीनगरला आले. तिथे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी शिवांशला मणक्याचा आजार असून, उपचारासाठी बराच खर्च लागेल, असे सांगितले. डॉक्टरांच्या भेटीनंतर मात्र दोघांनाही शिवांश नकोसा झाला.

अवश्य वाचा:  कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाने केली आत्महत्या

मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून आईवडील देवदर्शनाला  (Baby Killed By Parents)

प्रकाशने मित्राला समृद्धीमार्गे पुण्याला जायचे आहे,असे सांगून चारचाकी काढायला सांगितली. या चारचाकीतून तिघेही समृद्धी मार्ग पुण्याच्या दिशेने निघाले. प्रवासादरम्यान प्रकाश त्याचा मित्र हरिदासला म्हणाला, शिवांशला डॉक्टरांनी मोठा आजार सांगितला आहे. तो फार दिवस जिवंत राहू शकणार नाही. त्यावर त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यावेळी संध्यकाळचे सात वाजलेले होते. त्यांनी सिन्नरजवळ आल्यानंतर वाहन समृद्धीवरून खाली उतरविले. तिथे प्रकाशने शिवांशचा गळा दाबत त्याला जीवे मारले.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुलाच्या अंगावरील कपडे काढून घेऊन त्याचा मृतदेह पुलाखालील मुळा नदीत त्यांनी फेकून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ते पुढे देवदर्शनासाठी आळंदीला गेले. तेथून ते पुन्हा त्यांच्या गावी भोकरदनला गेले. तोपर्यंत पोलिसांना या घटनेचा सुगावा लागलेला होता. दुसऱ्याच दिवशी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पंडित दाम्पत्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मृत मुलाचे वडील प्रकाश जाधव, आई सविता जाधव व वाहन चालक हरिदास राठोड याला ताब्यात घेतलं आहे.