Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट

Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट

0
Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट
Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट

Bacchu Kadu : अकोले: प्रहार (Prahar) संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी कोंभाळणे (ता.अकोले) येथे जाऊन पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे (Rahibai Popere) यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून राहीबाई यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आज त्यांनी प्रत्यक्ष पूर्ण केली.

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

गावरान बियाण्यांचा संग्रह व बीजबँकची माहिती घेतली

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बच्चू कडू यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. गावरान बियाण्यांचा संग्रह व बीजबँक प्रकल्प यांची सविस्तर माहिती त्यांनी राहीबाईंकडून घेतली. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने पोपेरे यांनी देशातील पहिली गावरान बियाणे बँक उभारली होती. नामशेष होत चाललेले ५२ पिकांचे ११४ वाण त्यांनी गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केलेले आहेत. याप्रसंगी या सर्व बियाण्यांचे तसेच औषधी वनस्पतींचे प्रदर्शन त्यांनी भरवले होते. या प्रदर्शनाला भेट देऊन सविस्तर माहिती करून घेत अत्यंत मनमोकळ्या गप्पा केल्या.

Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट
Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

प्रदर्शनाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली (Bacchu Kadu)

बीज संवर्धनाचे कार्य करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. कोंभाळणे हे डोंगरावर वसलेले गाव असल्याने पाण्याची गंभीर समस्या येथे निर्माण होते. शेती व दैनंदिन वापरासाठी पाण्याची गंभीर समस्या असल्याचे त्यांनी कडू यांच्या लक्षात आणून दिले. शेतकऱ्यांसाठी गावरान बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी प्रहार संघटनेकडून व शासनाकडे पाठपुरावा करून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन बच्चू कडू यांनी बीजमाता राहीबाई यांना दिले. दरम्यान, अनेक पारंपरिक आणि नष्ट होत चाललेल्या संस्कृतीबद्दल सुद्धा दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.