नगर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी (Complete loan waiver for farmers) आणि इतर मागण्या घेऊन प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नागपुरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं चक्काजाम आंदोलन (Chakkajam movement) सुरु केलं आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही,असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी (Farmers) नागपुरात दाखल झाले आहेत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे. मात्र बच्चू कडू यांनी सुरु केलेल्या या आंदोलनात नेमक्या काय मागण्या केल्यात जाणून घ्या…
नक्की वाचा: मतासाठी नरेंद्र मोदींना नाचायला सांगितले तर ते नाचतीलही- राहूल गांधी
बच्चू कडू यांच्या मागण्या कोणत्या? (Bacchu Kadu)
१. बच्चू कडूंच्या मागण्यापैकी एक प्रमुख मागणी म्हणजे कोणत्याही अटी आणि शर्थींशिवाय शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज त्वरित माफ करावे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा. पीक कर्जाबरोबरच, मध्यम मुदतीचे, पॉली हाऊस, शेड नेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जांचा कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा.
२. २०२५-२६ या वर्षासाठी ऊसाला ९ टक्के रिकव्हरीसाठी प्रति टन ४३०० रुपये आणि वर प्रति टक्का रिकव्हरीसाठी ४३० रुपये एफआरपी द्यावा. आतापर्यंतची थकीत एफआरपीची रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात यावी. ही त्यांची दुसरी मागणी आहे.
३. कांद्याला किमान प्रति किलो ४० रुपये भाव देण्यात यावा. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात कर कायमस्वरुपी बंद करावा. भाव पाडण्यासाठी होत असलेला नाफेड व एनसीसीएफचा वापर बंद करावा आणि या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल यासाठी करावा.
४. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दिला जावा. गायीच्या दुधाला किमान ५० रुपये मूळ दर आणि म्हशीच्या दुधाला ६५ रुपये प्रति लिटर दर द्यावा. दूध क्षेत्राला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे. दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने ठोस धोरण तयार करावे.
५. शेतमालाला हमीभावावर २० टक्के अनुदान देण्यात यावे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लावून ५ लाख अनुदान दिले जावे.
६. पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधून करण्यात यावा.
७. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
८. दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी आणि अनाथांना महिन्याला ६ हजार रुपये मानधन देण्यात यावे.
९. मेंढपाळ व मच्छिमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्या यावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे.
१०. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्यात यावा.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
बच्चू कडू यांच्या आंदोलनावर आज निघणार तोडगा (Bacchu Kadu)

आता बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे. त्यानुसार आज संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपस्थित असतील. मात्र आजच्या या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ३१ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन उभं राहील आणि संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत बच्चू कडूंच्या मागण्यांवर तोडगा निघणार का ? की उद्या पुन्हा बच्चू कडूंच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागणार हेच पाहणे महत्वाचं ठरणार आहे.



