Bacchu Kadu:कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची एन्ट्री!

0
Bacchu Kadu: कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची एन्ट्री!
Bacchu Kadu: कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची एन्ट्री!

Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Local government elections) बिगुल वाजले असून, २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (ता.१०) सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी करत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अनेकांच्या मुलाखती घेणे सुरु केलं आहे. तर कोकणातील राजकारणात आता बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पार्टीची एन्ट्री होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्वतःही माहिती माध्यमांना दिली आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी!बीड नगरपरिषदेच्या छतावर आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह  

प्रहार रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक लढवणार (Bacchu Kadu)

प्रहार जनशक्ती पक्ष आता रत्नागिरी नगरपरिषदची निवडणूक लढवणार असून ५ ते ६ जागांवर प्रहार जनशक्ती आपले उमेदवार उभे करणार,अशी माहिती प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली आहे. तर पुढे बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियांवर देखील संताप व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा: “आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची”- राधाकृष्ण विखे पाटील   

‘निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल’ (Bacchu Kadu)

 बच्चू कडूंनी संताप व्यक्त करत सांगितले आहे की, ईव्हीएम मशीनचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे. सगळे नामर्दाची अवलाद आहेत. मशीन समोर करतात, मशीन मधून चोरी करतात. प्रामाणिकतेचे मत कुठे राहते? संविधानात अधिकार दिला आहे आपण कुणाला मत दिलं हे जाणून घेण्याचा. मात्र आज मत कुणाला दिलं हे आपल्याला कळत नाही. याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकतो का? असा प्रश्न देखील उपस्थित केला. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे,अशी शंका बच्चू कडूंनी व्यक्त केली.